Independence Day Speech Marathi : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये स्वातंत्र्य दिन निमित्त अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आज आपण या लेखामध्ये स्वातंत्र्य दिन निमित्त भाषण मराठीमध्ये बघणार आहोत आपण पाहणार आहोत Independence Day Speech marathi अतिशय सुंदर मराठी भाषण
भाषण सुरू करण्यात अगोदर सर्वप्रथम भाषणामध्ये या महत्त्वाच्या ओळी असाव्यात जेणेकरून भाषणाची सुरुवात चांगली होते .
Contents
Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
मंचावरील प्रमुख पाहुणे , अतिथीगणं , सन्मानीय प्राचार्य आणि शिक्षकवर्ग , तसेच येथे जमलेल्या सर्व विध्यार्थ्यांना अभिवादन करून मी भाषणाला सुरुवात करीत आहे.
!! स्वातंत्र्य वीरांना करूया शतः शतः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान !!
सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
सर्वांना माझा नमस्कार माझे नाव भारत (तुमचे नाव )आहे . आज १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन , आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकन्न जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .[Independence Day Speech Marathi]
आज पासून ७६ वर्षाआधी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या २०० वर्षांच्या गुलामगिरीतून सुटका भेटला होता. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी , शाहिद भगतसींग , सुखदेव , राजगुरू , लोकमान्य टिळक , बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली .
ब्रिटनचा भारतात साम्राज्यवादी राजवटीचा प्रदीर्घ इतिहास होता. परंतु ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या सुरुवातीच्या इतिहासात फार महत्त्वाची भूमिका बजावली. इ.स. १६१२ मध्ये इंग्रज सम्राट जेम्स पहिला याने मुघल सम्राट नूरुद्दीन सलीम जहांगीर यांना विनंती पाठवून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतीय मुख्य भूमीत प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावेळी मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली राज्य होते.[Independence Day Speech Marathi]
या विनंतीचा एक भाग म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात विशेष व्यापारी हक्क हवे होते, जेणेकरून त्याला इतर युरोपियन व्यापाऱ्यांशी स्पर्धा करावी लागणार नाही. १७०० च्या दशकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमधील आपल्या मुख्य तळापासून पूर्व भारताच्या मोठ्या भागावर आपले नियंत्रण वाढवले.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी न आपल्या कंपनीचा व्याप पूर्ण भारतभर पसरवला परंतु कंपनीने व्यापारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी थेट भारतावर ताबा म्हणून राज्य आणि नियंत्रण करण्याचे सुरु केले . भारताला या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी अणे चालवली सूर झाल्या . अनेकांना आपले प्राण गमवावे लागले .[Independence Day Speech Marathi ]
२०व्या शतकात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने चाले जाओ आंदोलन सूर केले .दुसऱ्या महायुद्धानंतर क्रांतिकारकांनी आपल्या चळवळ आणखी उग्र केल्या ब्रिटिशांना लक्षात आले की भारतावर त्यांना राज्य आणि युद्ध दोन्ही सांभाळता येणार नाही , तेव्हा ब्रिटनच्या पंप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची हमी दिली .आणि अखेर १५ अगस्त १९४७रोजी’ भारताला स्वतंत्र्य मिळाले .
आज भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही असणारा देश म्हणून ओळखला जातो . विविधतेत ऐकता म्हणजे काय , काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळे भाषा बोलणारे वेगवेगळे अण्ण खाणारे लोक एकत्र राहतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे भारत .एखाद्या बागेला फुले वेगवेगळी असतात पण त्याचा सुगंध एकच असतो असा आपला भारत आहे , सगळ्यांचे स्वर वेगवेगळे असतात पण त्यांचा स्वर एक असतो असा आपला भारत आहे. एवढी विविधता असूनही असा आपला भारत एक राष्ट्र म्हणून मोठ्या अभिमानाने उभा आहे.
आपला देश दिन प्रतिदिन पुढे जात आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या चार वर्षानंतर आपल्या देशाने राज्यघटना लागू केली. आपल्या राज्यघटनेने देशाला अधिक सक्षम केले. आज आपण जगातील सर्वात मोठी विविधता असलेली लोकशाही आहोत. कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिकी करणापर्यन्त आपण जगातील मोजक्या प्रगत देशाच्या पंक्तीत आहोत. व सतत आपला देश प्रगतीपथावर पुढे जात आहे. [Independence Day Speech Marathi ]
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरीबी सारख्या समस्या आ वासून आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही.चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. शेवटी मला म्हणावेसे वाटते की,
तिरंगा आमुचा ध्वज,
उंच उंच फडकवू.
प्राणपणाने लढून आम्ही,
शान याची वाढवू धन्यवाद !
असे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत .
यालेखातआपणभारताच्यास्वातंत्र्यदिनानिमित्तभाषणमराठीमध्येबघितले. लेखामध्येकाहीलिहायचंराहूनगेलेअसेलकिंवाकाहीचुकाअसतीलतरत्याआम्हालाकमेंटकरूनकळवाव्यातआम्हीत्यामध्येसुधारणाकरतराहू.[Independence Day Speech Marathi]
10 thoughts on “Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024”