Tehsildar Selection Process : आपल्या सगळ्यांचीच अशी इच्छा असते की आपणही मोठं शिक्षण घ्यावं आणि आपल्या गावाचा विकास करावा. आजचा हा आर्टिकल खास तुमच्याकरिता आहे तर तहसीलदार या पदाविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत,या पदाची निवड कशा प्रकारे होते तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला हवी त्यानंतर तुमचं प्रमोशन कशा प्रकारे होतो कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काम करावे लागेल आणि काम कोणती करावी लागतात कोणती कर्तव्य तहसीलदार या पदाला पार पाडावी लागतात संपूर्ण सविस्तर रित्या कोणत्याही प्रकारची तुम्हाला शंका या आर्टिकल मध्ये राहणार नाही
तहसीलदार बनण्यासाठी आपल्याला शासकीय सेवा प्रवेश परीक्षा (Civil Service Exam) द्याव्या लागतात. त्यातील एक महत्त्वाची परीक्षा असते ती म्हणजे तहसीलदाराची (Tasildar Exam). तुम्हालाही जाणून घ्यायला आवडेल की नक्की तहसीलदार या पदाची सॅलरी (Tahasildar Post Salary) किती असते आणि तुम्ही ती कशी मिळवू शकता. तेव्हा जाणून घेऊया की तहसीलदार बनण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत आणि त्यासाठी पात्रता किती लागते आणि तुम्हाला किती सॅलरी मिळवू शकता . या लेखात तहसीलदार , त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि महसूल प्रशासन व्यवस्थेतील श्रेणीबद्ध संरचना यावर प्रकाश टाकू.
Contents
तहसीलदार काय असतो (What is tahsildar) ?
- राज्य सरकारच्या गट ए (group A ) म्हणजे वरिष्ठ प्रशासनीय पदांमध्ये तहसीलदारांची गणना होते .
- जमीन महसूल (Land Revenue) जकाय अर्ज सर्वप्रथम तहसीलदाराकडे येतात आणि तो त्यावर योग्य निर्णय घेतो.
- प्रत्येक तालुक्यामध्ये एक तहसीलदार असतो. त्याच्या अधीनस्थ कार्यालय हे त्या तालुक्याचे मुख्य केंद्र असते.
- जमिनीच्या दाखल्यांची (Land Records) नोंदणी, विभाजन (Partition) आणि उत्परिवर्तन (Mutation) यासारख्या जमीनविषयक तसेच जन्म मृत्यू दाखले लग्न नोंदी इ . सर्व महत्वाच्या कामांची जबाबदारी तहसीलदारावर असते.
- तहसीलदार हे महसूल विभाग किंवा जिल्ह्याचे संपूर्ण प्रशासन व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार असतात. ते त्यांच्या कार्यक्षेत्रातील तलाठी आणि महसूल विभागातील इतर कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख करतात.
तहसीलदार या पदाला किती मिळते सॅलरी :
तहसीलदारांना 9300 ते 34,800 रूपये एवढा पगार मिळतो. ग्रेड पे 4800 इतका दर महिन्याला असतो. पदोन्नतीनंतर 15600 ते 39100 इतका पगार मिळतो. आणि ग्रेड पे हा 5400 इतका असतो. त्याचसोबत महागाई भत्ता, प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, पेन्शन आदी सुविधाही तुम्हाला मिळतात.
तहसीलदार काय काम करतात (What does Tehsildar ) ?
तहसीलदार हे केवळ जमिनीच्या नोंदी आणि महसुलाबाबतच काम करणारे अधिकारी नाहीत तर त्यांच्याकडे अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत.
तहसीलदार हे ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांसाठी सरकारचा मुख्य संपर्क बिंदू आहेत. ते अनेक महत्त्वपूर्ण सेवा पुरवतात आणि स्थानिक प्रशासनाचा एक अविभाज्य भाग आहेत.
तहसीलदाराची भूमिका जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने पार पाडणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
तहसीलदाराची कामे मुख्यत : खालीलप्रमाणे आहेत –
- महसूल संकलन
- भूमी अभिलेख व्यवस्थापन
- भूसंपादन
- न्यायिक कार्ये
- सार्वजनिक तक्रार निवारण
- नागरी सेवा
- निवडणुका
- आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्य मध्ये सहभागी होणे.
- कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करणे.
- सरकारी योजनांचे प्रचार आणि अंमलबजावणी करणे.
- नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करणे.
तहसीलदार पदासाठीची पात्रता :(Tehsildar Qualification details) –
तहसीलदार या पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे किंवा फॉर्म भरायचा आहे, त्यांना शासनाद्वारे लावून दिलेल्या शैक्षणिक पात्रता निकषांचे पालन करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार शैक्षणिक दृष्ट्या पात्र असेल तर त्याला तहसीलदार बनता येते.
शैक्षणिक पात्रते सोबतच अर्जदार उमेदवाराला वयोमर्यादा निकषांचे देखील पालन करावे लागते. जर उमेदवार रिझर्व कॅटेगरी मधील असेल तर त्याला यामध्ये काही प्रमाणात सूट दिली जाते, त्याची माहिती तुम्ही तहसीलदार भरती निघाल्यानंतर मिळवू शकता.
(Education Qualification criteria)
- तहसीलदार बनण्यासाठी अर्जदार उमेदवाराची शिक्षण हे किमान प्राथमिक झालेले असावे.
- अर्जदाराने ग्रॅज्युएशन देखील पूर्ण केले असावे.
- अर्जदाराला स्थानिक क्षेत्रातील भाषा वाचता लिहिता बोलता येणे आवश्यक आहे.
घटक (factors ) आवश्यकता (requirements) :
घटक (factors ) | आवश्यकता (requirements) |
वय मर्यादा | किमान वय :१९ वर्षे कमाल वय :३८ वर्षे |
वयोमर्यादेतील सवलत | राखीव / अनाथ: 43 वर्षे मागासवर्गीय: 43 वर्षे माजी सैनिक (सर्वसाधारण): 43 वर्षे पात्र खेळाडू (सामान्य/मागासवर्गीय): ४३ वर्षे माजी सैनिक (मागासवर्गीय): 48 वर्षे अपंग व्यक्ती: 45 वर्षे |
शैक्षणिक पात्रता | बॅचलर डिग्री(bachler degree) |
Number of Attempts() | General: 6 OBC: 9 SC/ST : अनलिमिटेड |
रहिवासी (domicile) | महाराष्ट्र , इंडिया |
मातृभाषा – | मराठी |
Tehsildar Exam Details ( तहसीलदार निवड प्रक्रिया ) :
तहसीलदार होण्यासाठी निवड प्रक्रियेचे तीन भाग करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे आहेत. जर तुम्हाला तहसीलदार व्हायचे असेल तर ही प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण तरच तुम्ही तसे करण्यास पात्र आहात.
1)स्क्रीनिंग चाचणी /पूर्व परीक्षा – ४०० गुण
२) मुख्य परीक्षा (Main Exam)– ८०० गुण, ही परीक्षा पास झाल्यावर पदांचा क्रम टाकावा लागतो. त्यात SDM, तहसीलदार, ACP असे जे Available पद असतील ते तुम्ही निवडू शकता.
३) मुलाखत (Interview) – १०० गुण
मुख्य परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळाले त्यावरून तुमची पोस्ट ठरणार. पोस्ट मिळाल्यानंतर पुणे इथे यशदा ही सरकारी organization आहे, इथे तुम्हाला ३ महिने तहसीलदारची पूर्ण ट्रेनिंग दिली जाते. त्यानंतर तुमची प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड होते, प्रोबेशन ऑफिसर चा Period संपल्यावर तहसीलदार या पदासाठी तुमचे पोस्टिंग होते.
Tehsildar Preliminary Exam Pattern
विषय | प्रश्न | एकूण मार्क्स | वेळ |
General Studies (GS) | 100 | 200 | 2 घंटे |
Civil Services Aptitude Test (CSAT) | 80 | 200 | 2 घंटे |
१८० प्रश्न | 400 मार्क |
Tehsildar Preliminary Exam Syllabus :
- General Studies (GS)
- Civil Services Aptitude Test (CSAT)
Tehsildar Mains Exam Pattern :
विषय | एकूण मार्क | वेळ |
Marathi Language | 100 | 3 घंटे |
English Language | 100 | 3 घंटे |
GS Paper I: History, Geography, and Agriculture | 150 | 2 घंटे |
GS Paper II: Indian Polity and Laws | 150 | 2 घंटे |
GS Paper III: Human Resource Development and Human Rights | 150 | 2 घंटे |
GS Paper IV: Science and Technology, Economy | 150 | 2 घंटे |
800 मार्क |
Tehsildar Mains Exam Syllabus :
मराठी | भारतीय कायदा आणि राजकारण |
इंग्रजी | मानवी हक्क |
भारताचा इतिहास (महाराष्ट्र) | मानव संसाधन विकास |
भूगोल | भारताची अर्थव्यवस्था |
कृषी | विज्ञान आणि तंत्रज्ञान |
मुलाखतीला बोलल्यानंतर तिथे उमेदवाराला अभ्यासक्रमा संबंधी तसेच इतर बाबी संबंधी देखील महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारल्यानंतर उमेदवाराचा परीक्षेतील Score तपासला जातो, मुलाखती ला देखील 100 मार्क असतात, मुलाखती मधील Performance नुसार उमेदवार तहसीलदार पदासाठी योग्य असेल तर त्याचे सिलेक्शन होते. निवड प्रक्रिया हि पूर्णपणे MPSC अंतर्गत पार पडते.
हे पण वाचा :
- IAS Selection Process 2024 : IAS अधिकारी व्हायचंय? कलेक्टर बनण्यासाठी काय करावे
- Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
- छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण |अतिशय सुंदर आणि जबरदस्त मराठी भाषण
- गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi 2023 | अप्रतिम मराठी भाषण
- Lokshahir Annabhau Sathe Speech in Marathi:’लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाषण’
- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण;’Savitribai Phule Jayanti Speech in Marathi’
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण;’Swami Vivekanand Speech in Marathi 2024′
- The Most Accurate Actual size of Online Ruler
आपल्याला सरकारी नोकर्याच्या संदर्भात आणखी माहिती आवश्यक आहे तर, कृपया नौकरीची अधिसूचना पहा, त्याची माहिती आपल्या मित्रांसोबत सामायिक करा आणि त्यांना सरकारी नोकर्याच्या संधी मिळवण्यात मदतीची करा. इतर सरकारी नोकर्यांसाठी मराठीतील फुलेरडी नोकर्यांसाठी दिनचर्या naukaricenter.com ला भेट द्या.”
1 thought on “Tehsildar Selection Process : तहसीलदार बनण्यासाठी काय करावे ? शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम जाणून घ्याजाणून घ्या संपूर्ण माहिती”