IAS Selection Process 2024 : IAS अधिकारी व्हायचंय? कलेक्टर बनण्यासाठी काय करावे,शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम जाणून घ्या

IAS Selection Process : नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये IAS अधिकारी कस व्हायचंय,कलेक्टर बनण्यासाठी काय करावे,यासाठी शैक्षणिक पात्रता व निवड प्रक्रिया काय असते आणि IAS Selection Process साठी अभ्यासक्रम कसा असतो हे जाणून घेऊया.

भारतीय नागरी सेवेंतर्गत आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची निवड केली जाते. ही नोकरीसाठी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. आयएएस अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो. त्या पदाच्या वर केवळ मंत्री असतात.

भारतात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेंतर्गत केवळ तीन पदांची भरती होते ज्यात IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) मध्ये अधिकारी होऊन तुम्ही जिल्हाधिकारी बनू शकता. IAS मध्ये अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला यूपीएससी (upsc) (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

IAS Selection Process In Marathi :

IAS आधिकारी या पोस्ट साठी उमेदवारास यूपीएससी म्हणजेच (केंद्रीय लोकसेवा आयोग) ही परिक्षा देणे अनिवार्य आसते . जर उमेदवार (केंद्रीय लोकसेवा आयोग ) यूपीएससी परीक्षा उतीर्ण झाला,तर त्याला आयएएस अधिकारी बनता येते .

यासाठी पात्र असलेल्या उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष यूपीएससी द्वारे शासनामार्फत केली जाते जर पात्र उमेदवार आयएएस अधिकारी बनण्यासाठी पात्र असेल तरच उमेदवाराची निवड केली जाते.

IAS ऑफिसर बनण्यासाठी IAS निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतात त्याची माहिती सविस्तर पाहूया

IAS निवड प्रक्रियेत चार टप्पे असतात :

  • IAS प्राथमिक परीक्षा(IAS Prelims Exam)
  • IAS मुख्य परीक्षा (IAS Mains Exam)
  • IAS मुख्य परीक्षा (Interview)
  • IAS Medical Test(आरोग्य तपासणी)

IAS निवड प्रक्रिया UPSC IAS अर्जाने सुरू होते आणि निकालानंतर UPSC द्वारे जाहीर केलेल्या शिफारस केलेल्या उमेदवारांच्या यादीसह समाप्त होते. UPSC IAS प्रिलिम्स 2024 16 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती . ही निवड प्रक्रियेची पहिली पायरी मानली जाते. जे उमेदवार IAS 2025 साठी अर्ज करण्याची योजना आखत आहेत त्यांना UPSC IAS पात्रता निकष वाचण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून ते अर्ज करण्यास पात्र आहेत की नाही हे समजू शकेल. आयएएस परीक्षेच्या प्रत्येक पेपरमध्ये उपस्थित राहणे आणि सर्व पेपर्ससाठी पात्र असणे अनिवार्य आहे.

मेडिकल टेस्ट मध्ये देखील उमेदवाराचे आरोग्य तपासले जाते, यामध्ये नवी दिल्ली येथे वेगवेगळ्या अधिकृत हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट घेतली जाते. मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवाराची Health तपासली जाते, जर उमेदवार पूर्णपणे निरोगी असेल तर मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवाराला पास केले जाते.

निवड प्रक्रियेतील सर्व स्टेज पूर्ण झाल्यानंतर जे उमेदवार पास झाले आहेत त्यांची All India Ranking काढली जाते, आणि त्यानुसार उमेदवार कलेक्टर या पदासाठी निवडले जातात.

IAS Elegibility Criteria Qualification :

IAS आधिकारी या पोस्ट साठी उमेदवारास शासनाने काही पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार शैक्षणिक पात्रता, वयाची अट मेडिकल आणि शारीरिक स्टॅंडर्ड हे जारी करण्यात आले आहेत. त्याची माहिती तुम्ही खाली दिलेली आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता.

UPSC CSE Eligibility Criteria
Age limit21 to 32 years
Age RelaxationOBC – 3 yearsSC/ST – 5 years
Minimum Educational QualificationGraduation
Number of AttemptsGeneral/EWS – 6OBC/PwBD – 9SC/ST – unlimited
NationalityCitizen of India

UPSC पात्रता निकष काय आहे?

नागरी सेवा परीक्षेसाठी UPSC पात्रता निकषांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :

  • राष्ट्रीयत्व: उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
  • वयोमर्यादा: परीक्षा वर्षाच्या 1 ऑगस्ट रोजी उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील आणि इतर विशिष्ट गटांतील उमेदवारांसाठी काही सवलती दिल्या जातात.
  • शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने भारतातील केंद्रीय किंवा राज्य विधानमंडळाच्या कायद्याद्वारे समाविष्ट केलेल्या विद्यापीठातून किंवा संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेल्या किंवा विद्यापीठ अनुदानाच्या कलम-3 अंतर्गत विद्यापीठ म्हणून घोषित केलेल्या इतर शैक्षणिक संस्थांमधून पदवी असणे आवश्यक आहे. आयोग कायदा, 1956.

IAS ची तयारी कशी कराल ?

 यूपीएससी परीक्षा देण्यासाठी किमान वयोमर्यादा २१ वर्षे आहे. या परीक्षेची तयारी करायची असेल तर ती या वयापासूनच करावी. कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३२ वर्षं असून उमेदवार जास्तीत जास्त ६ वेळा ही परीक्षा देऊ शकतो.

 दहावीनंतरच या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. यूपीएससीच्या तयारीसाठी अनेक खासगी तसेच शासकीय संस्थाही कार्यरत आहेत.

दररोजचे वर्तमानपत्र आणि नियतकालिक वाचणं अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमचे सामान्य ज्ञान अद्ययावत राहते.

दहावीनंतर असा विषय निवडा, ज्यात तुम्हाला रस आहे आणि हाच विषय तुम्ही सिव्हिल सर्व्हिससाठी निवडू शकाल. पसंतीचा विषय आधीच ठरल्याने तुम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.

यूपीएससी परीक्षेत एकूण २५ विषयांमधून आपल्याला विषय निवडायचा असतो. तोच विषय निवडा, जो तुम्हाला अभ्यासायला सोपा जाईल.

वेळेचे योग्य नियोजन करा. एक रुटीन तयार करा आणि त्याप्रमाणे तयारी करा. अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका.

IAS UPSC Exam Syllabus :

कलेक्टर होण्यासाठी अर्जदार उमेदवाराला यूपीएससीची परीक्षा द्यावी लागते, त्यामध्ये दोन परीक्षा असतात एक म्हणजे Prelims आणि दुसरी म्हणजे Mains.या दोन्ही पेपर मध्ये उमेदवाराला पास होणे अनिवार्य असते, दोन्ही पेपर झाल्यानंतर मुलाखतीद्वारे आणि मेडिकल टेस्ट अखेर उमेदवार निवडले जातात.

IAS UPSC Prelims Syllabus

Subjects:

Part I:

  • Current events of national and international importance.
  • History of India and Indian National Movement.
  • Indian and World Geography-Physical, Social, Economic Geography of India and the World.
  • Indian Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Public Policy, Rights Issues, etc.
  • Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector Initiatives, etc.
  • General issues on Environmental Ecology, Biodiversity, and Climate Change – that do not require subject specialization.
  • General Science

Part II:

  • Comprehension
  • Interpersonal skills including communication skills
  • Logical reasoning and analytical ability
  • Decision-making and problem-solving
  • General mental ability
  • Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation (charts, graphs, tables, data sufficiency, etc. – Class X level)
दोन अनिवार्य पेपरGeneral Studies Paper – I
General Studies Paper – II (CSAT)
एकूण प्रश्न GS Paper-I100
एकूण प्रश्न CSAT80
एकूण मार्क्स (400)GS Paper-I – 200 Marks
CSAT – 200 Marks
Negative Marking ⅓ for every wrong answer
एकूण वेळ (प्रत्येकी 2 घंटे)GS Paper – I: 2 घंटे (9:30 AM -11:30 AM)
CSAT: 2 घंटे (2:30 PM – 4:30 PM)

IAS UPSC Mains Syllabus

पेपरविषयमार्क्स
Paper – IEssay (can be written in the medium of the candidate’s choice)250
Paper – IIGeneral Studies – I (Indian Heritage & Culture, History & Geography of the World & Society)250
Paper – IIIGeneral Studies – II (Governance, Constitution, Polity, Social Justice & International Relations)250
Paper – IVGeneral Studies – III (Technology, Economic Development, Biodiversity, Security & Disaster Management)250
Paper – VGeneral Studies – IV (Ethics, Integrity & Aptitude)250
Paper – VIOptional Subject – Paper I250
Paper – VIIOptional Subject – Paper II250

IAS Selection Process FAQ

Who is eligible for the IAS UPSC Exam?

IAS UPSC Exam साठी ग्रॅज्युएशन आणि बॅचलर पदवीधर विद्यार्थी पात्र असणार आहे, ज्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले नाही त्यांना कलेक्टर या पदासाठी जी परीक्षा घेतली जाते त्यासाठी बसता येणार नाही.

How to apply for the IAS UPSC Exam?

IAS UPSC Exam साठी उमेदवार ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करू शकतात. जर तुम्हाला अर्ज कसा सादर करायचा याची माहिती नसेल, तर तुम्ही कोणत्याही ऑनलाईन सेंटरवर जाऊन यूपीएससी साठी आपला फॉर्म भरू शकता.

UPSC मध्ये किती प्रयत्न होतात?

UPSC CSE साठी परवानगी असलेल्या प्रयत्नांची संख्या उमेदवाराच्या श्रेणीनुसार बदलते. येथे प्रयत्न मर्यादा आहेत:

  • सामान्य श्रेणी उमेदवार: 32 वर्षे वयापर्यंत 6 प्रयत्न.
  • OBC उमेदवार: वयाच्या 35 वर्षापर्यंत 9 प्रयत्न.
  • SC/ST उमेदवार: 37 वर्षे वयापर्यंत अमर्यादित प्रयत्न.
  • बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PwBD): प्रयत्नांची संख्या 9 आहे.

IAS साठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

UPSC द्वारे आयोजित IAS परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवाराने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांना मुख्य IAS परीक्षा अर्ज प्रक्रियेदरम्यान पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा देणे आवश्यक आहे.

12वी पास UPSC साठी अर्ज करू शकतो का?

नाही, 12वी उत्तीर्ण उमेदवार UPSC CSE साठी थेट अर्ज करू शकत नाही. यूपीएससी सीएसईसाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी आहे . पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले किंवा पदवीच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

हे पण वाचा :

Share With Your Frends

Driven by a passion for writing and a thirst for knowledge, Rutuja Waghmare is embarking on a journey into content creation while actively exploring job opportunities and educational pathways. With a dedication to learning and a keen interest in content creation, she aims to provide valuable insights through engaging articles and blog posts. Eager to connect and grow, Rutuja is committed to sharing information on career development and educational opportunities.

8 thoughts on “IAS Selection Process 2024 : IAS अधिकारी व्हायचंय? कलेक्टर बनण्यासाठी काय करावे,शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम जाणून घ्या”

Leave a Reply