Savitribai Phule Jayanti Speech in Marathi : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये सावित्रीबाई फुले(Savitribai Phule) जयंती निमित्त अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आज आपण या लेखामध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भाषण मराठीमध्ये बघणार आहोत.
भाषण सुरू करण्यात अगोदर सर्वप्रथम भाषणामध्ये या महत्त्वाच्या ओळी असाव्यात जेणेकरून भाषणाची सुरुवात चांगली होते .
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो.
सावित्रीबाई फुले
स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात ,
पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती
म्हणून तर आज जागती …..
अमर आहे सावित्री…..
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचे काम समजून घ्यायला आपल्याला सावित्रीबाईनी समजून घ्यावे लागेल . सावित्रीबाई फुले यांना समजून कसं घ्यायचं हा जेव्हा मी प्रथम विचार करायला लागले त्या वेळी माझ्या मनात विचार येतो कि सावित्रीबाई शिकल्या त्यांनी मुलींना शिकवलं हे बोलायला वाचायला खूप सोप आहे पण सावित्रीबाई फुले ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या व मुलींना शिकवलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला कळेल.
मुली जन्मल्या म्हणजे पाप अशी समजूत ज्या काली असे समजले जायचे , ज्या काळात मुली नऊ दहा वर्षाच्या झाल्या की त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्षे वयाने मोठ्या पुरुषाशी लावून दिलं जात होतं अशी भयंकर परिस्थिती होती. त्या काळात महिलांना अबला कमजोर समजलं जायचं. त्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकार नव्हते त्याना समाजात मान सन्मान नव्हता त्याकाळी महिला फक्त चूल व मूल याकरिताच होत्या. त्या काळच्या काही कर्मठ लोकांना माहीत होतं या महिला जर साक्षर झाल्या तर आपला तबला वाजवल्या शिवाय राहणार नाहीत. अशा अंधकाराच्या वातावरणात एका वाघिनीचा जन्म झाला आणि त्या वाघिनीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तरी सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभ राहत त्यांचं सुंदर प्रतिबिंब. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी त्यांच अख्ख आयुष्य पणाला लावलं. सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी, स्त्रीमुक्तीसाठी व स्त्री शिक्षणासाठी खर्च केल.
मित्रहो, अशा थोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगांव येथील दलित कुटुंबात 3 जानेवारी, 1831 साली झाला. त्यांचा वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. 1840 साली नऊ वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले.जोतिराव त्यावेळी होते अवघे १३ वर्षाचे. ज्योतीराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ता होते. ज्या वेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले नव्हते .
ज्या काली कर्मठ समाजाला स्रियांनी शाळेत जाणे मान्य नव्हते , अशात जोतिराबांनी धारिष्टकेलं. सावित्रीबाईंना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाईंची देखील त्याना उत्तम साथ लाभली. एका ठिकाणी तर मी असं देखील बाचलंय जोतिरावांनी घरीच शिक्षण दिल्याचे , तसंच अहमदनगर येथील फरार बाईंच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचं प्रशिक्षण घेतलं होतं. असं शासकीय कागदपत्रांवरुन दिसून येतं. तसंच तत्कालीन दस्ताऐवजावरुनही असच स्पष्ट होतं की सावित्रीबाई या भारतीय आद्यशिक्षिका आणि मुख्याध्यापिका आहेत
मंडळी, म्हणजे त्यांनी “टाकलेलं पाऊल ‘ हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सामाजिक जीवनाची’ खरी खुरी सुरुवात म्हणायची . सावित्रीबाईंच्या समाज कार्यात जोतिबाची भरपूर साथ मिळाली. त्यांनी सावित्रीबाईंना घरातच शिकवणे सुरू केले. जोतिबांच्या या कार्याला सावित्रीबाईंच्या वडिलांचा विरोध होता, पण तरीही जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकवणे सुरू ठेवले. या नंतर त्यांनी सावित्रीबाईंचे एडमिशन एका विद्यालयात केले. समाजातील लोक याला विरोध करू लागले. पण त्या कडे लक्ष न देता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग इतर महिलांना शिक्षण देण्यासाठी करण्याचा विचार सावित्रीबाईंनी केला, पण ते एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हते कारण त्यावेळी मुलींना समाजात शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती.सावित्रीबाई फुले घरोघरी जाऊन महिलांना त्यांच्या मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत व साक्षर होण्यासाठी शिक्षणाचे धडे घेण्याचा आग्रह करत असत. समाजातील सर्व महिलांना मुलींना शिक्षित करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना एकाच छताखाली सर्व महिलांना व मुलींना साक्षर करता यावे शिक्षणाचे धडे देता यावे यासाठी त्यांना एका शाळेची उणीव भासू लागली आणि त्यासाठी त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेत स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली[Savitribai Phule Jayanti Speech in Marathi]
पण या पावलामुळे कुटुंबावर आणि समाजातील लोकांवर समाजाने बहिष्कार टाकला . त आपल्या अंगावर दगड किंबा चिखल फेकणाऱ्या टवाळांना त्या शांतपणे म्हणत, ‘ मी माझ्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र कार्य करत असतां; तुम्ही माझ्या अंगावर फेकलेले दगड किंवा शेण ही मला फुलंच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो ! ‘ असं म्हणून त्या पुढे चालू लागत. पण फुले दाम्पत्याला मित्र उस्मान शेख आणि त्याची बहीण फातिमा शेख यांनी आश्रय दिला आणि फुले यांना शाळा सुरू करण्यासाठी त्यांच्या आवारात जागाही दिली. सावित्रीबाई या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या. पुढे ज्योतीराव आणि सावित्रीबाई यांनी अस्पृश्य आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मंगल आणि महार जातीच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. १८५२ साली फुले यांनी तीन शाळा चालवल्या. त्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी ब्रिटिश सरकारने फुले दाम्पत्याला शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित केले, तर सावित्रीबाईंना सर्वोत्कृष्ट शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले. त्या वर्षी त्यांनी महिलांमध्ये त्यांचे हक्क, सन्मान आणि इतर सामाजिक प्रश्नांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला सेवा मंडळाची स्थापना केली. देशातल्या हजारो वर्षातल्या धार्मिक परंपरा नाकारुन त्या विरोधात विधायक विद्रोह करणारे समाजाने उचललेलं पहिलं क्रांतिकारी पाऊल सावित्रीबाईंच्याच पुढाकारान
एकणाविसव्या शतकात त्यांनी अस्पृश्यता, सतीप्रथा, बाल विवाह, विधवा विवाह इत्यादी विरुद्ध सुद्धा कार्य केले. सावित्रीबाई फुले या देशाच्या प्रथम महिला महिला मुख्यद्यापिका आणि नारी मुक्त आंदोलनाच्या नेता होत्या. सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करायला जात असलेल्या एक गर्भवती विधवा ब्राह्मण महिला, काशीबाई ह्यांना वाचवून आपल्या घरी डिलिवरी केले. त्यांचा मुलगा यशवंत याला आपला दत्तक पुत्र म्हणून मोठे केले. 10 मार्च 1897 साली ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. जोतिबांच्या राहिलेल्या कार्याला पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले. आपले पूर्ण आयुष्य त्यांनी दलित व वाचीतांच्या अधिकारांसाठी घालून दिले. 1897 साली देशात प्लेग ची साथ पसरली होती. सावित्रीबाई या प्लेग च्या रुग्णांची पूर्ण श्रध्देने सेवा करीत होत्या. प्लेग संक्रमित लोकांची सेवा करीत असतानाच त्यांनाही प्लेग झाला व 10 मार्च 1897 ला प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले. आज जगात वाढत असलेल्या स्त्री सशक्तीकरणाची सुरुवात सावित्रीबाई व जोतिबांच्या प्रयत्नामुळेच संभव होती. अश्या या महान समाज सुधारकांना माझा प्रणाम.
जाता जाता एवढंच म्हणेन ,
तीन जानेवारीला,
नमन करू सावित्रीला,
सावित्रीच्या जन्मदिनाला,
मान मिळाला बालिकादिनाचा.
या लेखात आपण सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
हे पण वाचा :
- छत्रपती शाहू महाराज मराठी भाषण | Rajarshi Shahu Maharaj Bhashan 2024
- Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
- छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण |अतिशय सुंदर आणि जबरदस्त मराठी भाषण
- गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi 2023 | अप्रतिम मराठी भाषण
- Lokshahir Annabhau Sathe Speech in Marathi:’लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाषण’
- The Most Accurate Actual size of Online Ruler
1 thought on “सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण;’Savitribai Phule Jayanti Speech in Marathi’”