Kotak Bank Scholarship 2024 : नुकतीच दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या स्कॉलरशीपची संधी आहे. राज्य सरकारच्या बँकांनी विध्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी व त्याच्या पुढील उच्च शी शी शीक्षणासाठी अनेक स्कॉलरशिप सुरु केल्या. ही स्कॉलरशीप कोटक महिंद्रा बँकेकडून आहे . याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Contents
कोटक बँक स्कॉलरशीप 2024 :
कोटक जुनिअर स्कॉलरशीप प्रोग्राम 2024-25 हा कोटक महिंद्रा ग्रुप च्या कोटक एज्युकेशन फाऊंडेशनचा c.s.r उपक्रम आहे . मुंबई महानगर प्रदेशातील (M.M.R ) S.S.C/C.B.S.E /इ.क.स.ए बोर्डातून १० वी उत्तीर्ण झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना अमूल्य आर्थिक साहाय्य आणि पाठबळ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे .
ज्या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी दरमहा ३,५०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असून २१ महिन्यांसाठी एकूण ७३,५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यांचे क्षितिज विस्तृत करण्यासाठी आणि त्यांचे शिकण्याचे अनुभव वाढविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन समर्थन, शैक्षणिक सहाय्य, करिअर मार्गदर्शन आणि एक्सपोजर भेटींद्वारे लाभ देखील मिळतील.अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२४ आहे.
नियम व अटी (Terms And Conditions) :
- विद्यार्थ्याला दहावीमध्ये कमीत कमी 85 टक्के गुण असणे आवश्यक आहे .
- विद्यार्थ्यांची 10 वी 2024 मध्ये झालेली असावी
- विद्यार्थ्याने 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये कला , विज्ञान अथवा वाणिज्य शाखेत इ.11 वी साठी प्रवेश मिळवला असणे आवश्यक आहे .
- विद्यार्थ्याचे / कौटंबिक मागलि वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे 320,000/- पेक्षा कमी असावे .
- विद्यार्थी /विद्यार्थिनी हा /ही 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये वास्तव्यास असणे आवश्यक असेल .
- कोटक एज्यकेशन आणि बडी फॉर स्टडी यांच्या पाल्यांसाठी ही योजना लागू नाही .
बेनिफिट्स ऑफ कोटक महिंद्रा बँक स्कॉलरशिप :
सदर शिष्यवृत्ती योजना अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इ.अकरावी व बारावी दरम्यान दरमहा 3,500/- रुपये असे 21 महिन्यांकरीता 73,500/- रुपये इतकी शिष्यवृत्ती रक्कम दिली जाईल . विद्याथ्यांना संबंधित स्कॉलरशिप ची रक्कम दर ३ किंवा ६ महिन्यात देण्यात येईल .
कोटक महिंद्रा स्कॉलरशीपसाठी लागणारी कागदपत्रे :
- S.S.C/C.B.S.E /I.C.S. E चे दहावीचे मार्कशीट .
- पासपोर्ट फोटो झेरॉक्स .
- शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स .
- विद्यार्थ्यांचे बँक खाते झेरॉक्स .
- उत्पन्नाचा दाखला झेरॉक्स .
- विध्यार्थी व पालकाचे आधारकार्ड झेरॉक्स .
- वडिलांचे पॅन कार्ड झेरॉक्स .
कोटक महिंद्रा स्कॉलरशीपसाठी अर्ज कसा करावा :
- शिष्यवृत्ती लाभ घेण्याकरीता खाली दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करा .
- वेबसाईट वर कोटक महिंद्रा बँक स्कॉलरशीप ऑप्शन वर क्लिक करा
- अर्जावर apply now वर क्लिक करा व आपली माहिती भरून घ्या .
हे पण वाचा :
- छत्रपती शाहू महाराज मराठी भाषण | Rajarshi Shahu Maharaj Bhashan 2024
- Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
- छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण |अतिशय सुंदर आणि जबरदस्त मराठी भाषण
- गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi 2023 | अप्रतिम मराठी भाषण
- Lokshahir Annabhau Sathe Speech in Marathi:’लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाषण’
- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण;’Savitribai Phule Jayanti Speech in Marathi’
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण;’Swami Vivekanand Speech in Marathi 2024′
- The Most Accurate Actual size of Online Ruler
1 thought on “Kotak Bank Scholarship 2024: 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 73500 रुपये शिष्यवृत्ती मिळणार ! शेवटची तारीख, पात्रता , अर्ज कसा करायचा.”