स्वामी विवेकानंद मराठी भाषण;’Swami Vivekanand Speech in Marathi 2024′

swami vivekanand speech in marathi : स्वामी विवेकानंद मराठी भाषण नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आज आपण या लेखामध्ये स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भाषण मराठीमध्ये बघणार आहोत.

भाषण
सुरू करण्यात अगोदर सर्वप्रथम भाषणामध्ये या महत्त्वाच्या ओळी असाव्यात जेणेकरून
भाषणाची सुरुवात चांगली होते .

सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो.

स्वामी विवेकानंद मराठी भाषण.

इतिहास तु वळूनी

पाहसी पाठीमागे जरा ….

झुकून मस्तक करते

स्वामी विवेकानंदना मुजरा….

                                        आदरणीय व्यासपीठ, शिक्षाक, , समारंभाचे प्रमुख अतिथी, सर्व मित्र मैत्रिणी ! आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती! श्री रामकृष्ण परमहंसांचे पट्टशिष्य होण्याचा सन्मान मिळवणारे व ‘स्वतःघडा व दुसऱ्यांना ही घडवा’ असा स्वतःच्या आचरणाने संदेश देणारे, हिंदू धर्माची माहिती साऱ्या जगाला पटविणारे भारतमातेचे सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचा बदल आज मी भाषण देणार आहे.

Ref Img From :https://www.peakpx.com/

[swami vivekanand speech in marathi]

                           ११ सप्टेंबर १८९३ हा दिवस केवळ शिकागो शहरातच नव्हे तर भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. शिकागोयेथील जगप्रसिद्ध ‘पार्लमेंट ऑफ रिलिजन’च्या सभागृहात एका ३० वर्षीय भारतीय तरुणाने आपल्या ओघवत्या भाषणाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले.मित्रांनो, माझ्या बं धूनी. आणि भगिनींनो .” असं समोरच्या . श्रोतृवर्गाला संबोधून आपल्या अस्खलित वाणीनं… ओजस्वी विचार मांडणारा तेजस्वी पुरुष आपल्या भारतातच होऊन गेला. शतक लोटलं..  पण आजही त्यांचं कार्य केवळ भारतातच नाही. तर जगभर चालू आहे. अगदी मनापासून भक्तिभावानं त्यांचे कार्यकर्ते रामकृष्ण मिशन या संस्थेचं काम करत आहेत. शिवाय ठिकठिकाणी असलेली  विंबेकानंद केंद्र देखील आपल्याला ज्ञात आहेतच. मुलांवर चांगले संस्कार घडविणं, मुलांना वाचनाची आवड लावणं, एकाग्रता आणि आरोग्यासाठी योग- साधना करणं, आपली अस्मिता जपणं, एक ना अनेक समाजोपयोगी उपक्रम या केंद्रामार्फत राबविले जातात: या सगळ्याचे मूळ स्त्रोत… प्रेरणा… म्हणजे . ‘स्वामी विवेकानंद!’ ..

                          स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्ता जवळील शिमुलिया खेड्यात १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला.त्यांचं वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी असे होते. स्वामी विवेकानंद यांचे पाळण्यातील नाव वीरेश्वर असे होते.बालपणी त्यांची वृत्ती खोडकर होती. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. लहानपणीपासून त्यांचे चित्त एकाग्र होत असे.लहानपणीपासून कोणतीही गोष्ट ते पारखून घेत असे.नवसानं झालेला मुलगा, श्रीमंतीत कोडकौतुकात वाढत होता. आईनंकेलेले उच्च संस्कार, वडिलांची सामाजिक बांधिलकीची जाणीव, त्यांचे उदात्त विचार, त्यासोबतच मिळालेले चांगले शिक्षण .  या सगळ्याचा परिणाम नरेंद्र ‘ वर होत होता आणि यातूनच घडत घडत  नरेंद्र ‘ चा विवेकानंद .. झाला. लोक त्यांना ‘ स्वामीजी ‘ असे आदराने हाक मारु लागले… त्यांचे भक्त झाले. ते काही त्यांनी दैवी चमत्कार दाखविले म्हणून नाही !… अंधश्रद्धा’ ही रुढी त्यांना मान्यच नव्हती ते फक्त ज्ञान आणि विज्ञानावर . विश्वास ठेवत असत. त्यातच  रामकृष्ण परमहंस ‘च्या रुपाने त्यांना गुरु. मिळाला. तो ही एक दिव्यपुरुषच ! एकां दिव्यपुरुषाने दुसरा दिव्यपुरुष घडविला. ‘ ज्योत से ज्योत जलाते चलो  या प्रमाणं रामकृष्णांनी आपल्या ‘ साधनेचा -ज्ञानाचा बारसा विवेकानंदांना दिला. विवेकानंदांनी देखीलगुरुने दिला ज्ञानरुपी वसा,  ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा… ‘

                           ते   मेट्रोपोलिटिअन इन्स्टिट्यूटमधून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले  आणि जनरल असेंबली इन्स्टिट्यूशन मधून एफ ए आणि बीए च्या परीक्षा पास केल्या. अभ्यासात तत्वज्ञान या विषयाला त्यांचे प्रथम प्राधान्य होते. तत्वज्ञानाचे विद्यार्थी असल्याकारणाने त्यांच्या मनात ईश्वर विषयक प्रश्न सतत उठत असत. देव आहे का? देव असेल तर मग कसा असेल? माणसाचे आणि ईश्वराचे परस्पर संबंध कशा प्रकारचे असतील? ज्या सृष्टीत इतका विरोधाभास जाणवत असतो की खरोखर ईश्वराने निर्माण केली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न नरेंद्र यांच्या मनात येऊ लागले. आपले कुतूहल शांत करण्यासाठी ब्रह्मसमाजाव्यतिरिक्त अनेक साधू-संतांकडे भटकंती करून शेवटी .एकदा त्यांच्या एका नातेवाईकांनी नरेंद्र यांना सुचवले की त्यांनी दक्षिणेश्वराला असणाऱ्या श्रीराम कृष्णाची भेट घ्यावी तेथेच त्यांच्या धर्मविषयक सर्व शंकांचे निरसन होईल. यानंतर एक दिवस नरेंद्रनाथ दक्षिणेश्वराला गेले आणि त्यांनी ‘आपण ईश्वर बघितला आहे का?’ असा सरळ प्रश्न श्रीरामकृष्णांना विचारला. त्यावर श्रीराम कृष्ण म्हणाले की त्यांनी ईश्वराला बघितले आहे आणि नरेंद्राची इच्छा असेल तर त्यालाही ते ईश्वरदर्शन घडवू शकतात.  ते रामकृष्ण परमहंसांच्या आश्रयाला गेले. रामकृष्णांच्या गूढ व्यक्तिमत्त्वाने त्यांच्यावर प्रभाव पाडला, त्यांचे जीवन बदलून टाकले. रामकृष्णांना गुरू बनवल्यानंतर त्यांचे नाव विवेकानंद असे झाले[swami vivekanand speech in marathi]

                         विवेकानंदांना संगीत, साहित्य आणि तत्त्वज्ञान ाची प्रचंड आवड होती. पोहणे, घोडेस्वारी आणि कुस्ती हे त्यांचे छंद होते. वयाच्या २५ व्या वर्षी स्वामीजींनी वेद, पुराणे, बायबल, कुराण, धम्मपद, तनख, गुरु ग्रंथ साहिब, दास कपिटल, भांडवलशाही, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान अशा सर्व प्रकारच्या विचारधारांचा गळा घोटला होता. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे ते सर्व धर्म आणि तत्त्वज्ञानाविषयी अविश्वासाने भरून गेले. संशयी, गोंधळलेले आणि विरोधाभासी कोणत्याही विचारधारेवर विश्वास ठेवत नव्हते. देशाची सर्व दृष्टीने सुधारणा करण्याच्या प्रगतीच्या दृष्टीने निःस्वार्थ भावनेने वाहून घेणारे नवे संन्यासी तयार व्हावयास हवे असे त्यांना वाटले. स्वामी विवेकानंदानी संन्यास ग्रहणानंतर सहा वर्षे संपूर्ण हिंदूस्थानातून प्रवासकेला. भारतीय ऋषी मुनींनी दिलेला थोर सेवाधर्माचा संदेश त्यांनी जगभर पसरविला.अंगावरती भगवी वस्त्रं, डोक्यावरती फेटा घालूनस्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञानलोकांच्यासमोर मांडण्यासाठी जगभ्रमंती केली. शिकागोतील धर्मपरिषदेमध्ये ११ सप्टेंबरला १८९३ स्वामीजी ज्यावेळी,शिकागो येथे धर्मपरिषदेसाठी गेले होते. त्यावेळी स्वामीजींचा वेशपाहून सर्व लोक अचंबित झाले होते. हा संन्याशी माणूस काय बोलणारअसा सर्व लोकांना प्रश्न पडला होता. स्वामीजी ज्यावेळी बोलायलाउभे राहिले. सभागृहावरती चौफेर नजर फिरवल्यानंतर स्वामीजींनी आपल्याभाषणाची सुरुवात “माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो“ या एकाच वाक्याने केली आणि सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.अवध्या पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी सर्व सभा जिंकली.स्वामीजीचे वक्तृत्व प्रभावी होते.त्यांच्या शब्दांनी ते सर्वांची हृदय जिंकून घेत

                               स्वामी विवेकानंद यांनी   विदेशतून भारतात परत आल्यावर १८९८ मध्ये  ‘रामकृष्ण मठ’ स्थापना केली . त्या नंतर रामकृष्ण मिशनची स्थापना केली.. त्यांच्यामते, पश्चिमेने बाह्य जग तर पूर्वेने आंतरिक जग जिंकण्याचे प्रयत्न केले होते.पण दोघांनी हातात हात घालून एकमेकांचे भले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भविष्यकाळाला नवे वळण दिले पाहिजे. म्हणजे पूर्व-पश्चिम हा भेट राहणार नाही. विज्ञानाच्या साहाय्याने सर्व गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत. धर्म हा भारताचा केंद्रबिंदू आहे, गाभा आहे असे त्यांचे मत होते .

१२ जानेवारी “युवक दिन” म्हणून साजरा केला जातो कारण त्या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन असतो. आजच्या युवा पिढीने याच गोष्टीचा आदर्शघेण्याचे कार्य जर केले तर स्वामीजींच्या स्वप्नातील हा देश साकारहोईल असे वाटते.कर्मकांडांना विरोध करून मानवतावादी विचार मांडणारे समतेचासंदेश देणारे राष्ट्रप्रेमाची पताका खांद्यावरती घेऊन धर्मप्रसार करणारा एक महान विभूती म्हणून स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिले जातेयाच तपस्वी, त्यागी वृत्तीचा, प्रगल्भ बुद्धिमत्ता असणाऱ्या युवकांचा आदर्श आजच्या युवा पिढीने त्यांची जयंती युवक दिन म्हणून साजरी करत असताना घेणे गरजेचे आहे.

४ जुलै १९०२ रोजी स्वामी विवेकानंद यांचे निधन झाले. अशा या थोर विचारवंट्याला माझे कोटी कोटी प्रणाम ..

या लेखात आपण स्वामी विवेकानंद जयंती भाषण मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.[swami vivekanand speech in marathi]

हे पण वाचा :




Share With Your Frends

Driven by a passion for writing and a thirst for knowledge, Rutuja Waghmare is embarking on a journey into content creation while actively exploring job opportunities and educational pathways. With a dedication to learning and a keen interest in content creation, she aims to provide valuable insights through engaging articles and blog posts. Eager to connect and grow, Rutuja is committed to sharing information on career development and educational opportunities.

2 thoughts on “स्वामी विवेकानंद मराठी भाषण;’Swami Vivekanand Speech in Marathi 2024′”

Leave a Reply