शेतकरी भाषण मराठी : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये शेतकरी विषयी अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आहोत .आज आपण या लेखामध्ये शेतकरी विषयी भाषण मराठीमध्ये बघणार आहोत.
भाषण सुरू करण्यात अगोदर सर्वप्रथम भाषणामध्ये या महत्त्वाच्या ओळी असाव्यात जेणेकरून भाषणाची सुरुवात चांगली होते .
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो.
शेतकरी
एक दिवा खूप काही सांगतो
सूर्या एवढे तेज नसले तरी
अंधःकाराला भेदतो निशेच्या किट्ट काळोखात
(मनीषा जोशी)
असाच एक दिवा जो स्वतः उपाशी राहून सगळ्या जगाला अन्न पुरवतो तो म्हणजे शेतकरी . आपण कधी विचार केलाय का की ताटात अन्न तसेच ठेवून कचऱ्यात काही सेकंदात फेकून देतो , त्या सर्व गोष्टी पिकवताना,शेतकऱ्याला किती त्रास सहन करावा लागला असेल? शेतकरी स्वतः कापूस पिकवतो, मात्र त्याच्या अंगावर कपडे नसतात.
लाखो रुपयांच्या शेतीचा तो मालक असतो. परंतु खिशात त्याच्या दमडीही नसते. लाखो रुपयांची स्थावर मालमत्ता असलेल्या शेतकऱ्याकडे कर्ज घेण्यावाचून पर्याय नसतो. जमीन विकला जात नाही कारण ती मुलांसाठी लागते. कसेही उसने पासने करून तो त्याचा उदरनिर्वाह करतो.
मला खात्री आहे की आपल्यापैकी बहुतेकांनी एकदाही विचार न करता हे केले. अन्न सहज उपलब्ध आहे, फक्त एक नळ दूर आहे, हे लक्षात घेता, हल्ली खरोखर त्रास घेण्याचे किंवा जास्त विचार करण्याचे काहीच कारण नाही.सर्वसाधारणपणे शेतीवर देखरेख ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना आपण आपल्या देशाचा, भारताचा किंवा आपल्या अन्नाचा कणा मानत नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील शेतकऱ्यांचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे.
आपल्या देशाचा शेती हा पाया आहे. देशातील प्रत्येकाला जेवण मिळावे यासाठी जो आयुष्यभर खूप प्रयत्न करत असतो तो म्हणजे शेतकरी आणि भारतातील सुमारे दोन तृतीयांश(२/३) लोक शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात. ते शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत आणि अन्न, चारा आणि इतर मूलभूत संसाधने तयार करतात.
सध्याच्या सामाजिक-आर्थिक क्षेत्रात देशाच्या प्रगतीसाठी शेतकरी हा सर्वात महत्त्वाचा गट आहे, हे आपण पाहू शकतो. प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष, समाजातील त्यांचा सहभाग विकासावर मोठा प्रभाव पाडतो. शेतकरी शेती उद्योगात काम करतात. देशाच्या अर्थव्यवस्थेचा ही मोठा भाग शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. भारताच्या कृषी उद्योगाचे हृदय शेतकरी आहेत . बहुसंख्य भारतीयांसाठी शेती हेच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. टेबलवर अन्न ठेवणे सोपे असते , पण त्यामागचे सोसलेले कष्ट समजून घेणे फार अवघड
इथे आपल्याला ताटात वाढलेलं अन्न नको नकोस वाटतं आणि त्याच अन्नासाठी शेतकऱ्यांना दिवसभर शेतात राबावं लागतं . शेतकरी फार मोठ्या मनाचे असतात.
पण त्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात. कधी पाऊस दगा देतो. तो पडतच नाही. शेती होऊ शकत नाही. कधी अतिवृष्टी होते. त्यामुळे शेत वाहून जाते. या संकटांना तोंड देत तो अन्नधान्य निर्माण करतो. पण त्याच्या पिकाला बाजारात पुरेशी किंमत येत नाही. हाती आलेला पैसा सावकार बळकावतो. त्याला स्वत:च्या संसारासाठी काही शिल्लक राहत नाही. भविष्याच्या भयाण चिंतेत शेतकरी बुडून जातो. काही शेतकरी तर निराशेने आत्महत्या करतात.
भारतातील विविध भागांत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे, ती सातत्याने शेतीच्या संकटाला कारणीभूत ठरते. जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळे निर्माण झालेल्या संरचनात्मक बदलांशी आणि परिणामी टंचाई किंवा कमतरतेचमुळे हे होत आहे , उदाहरणार्थ, किंमती, वाढ आणि संसाधने. मध्यम वर्गीय शेतकरी का आत्महत्या करीत आहेत हे स्पष्ट करण्यासाठी आर्थिक तर्कशुद्धतेची चौकट अपुरी आहे.
पावसाचे आणि शेतकऱ्याचे वेगळच नात आहे .
नको नको रे बरसू असा
अवकाळी तू वरुणराजा
अन्नदात्याची नको रे बघूस
अशी त परीक्षा
शेतकरी भाषण मराठी | Farmer Speech in Marathi
ते म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न तसेच बळीराजासोबत होत असते जसा पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज असते जिथे पाऊस शेतकऱ्यांसाठी देवासारखा मदतीस पडतो तिथे पाऊस शेतकऱ्याची चेष्टा केल्यासाखं करतो.या पावसाच्या लपंडावाने शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठीच्या कारणात आणखी एक भर होऊन जाते.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१५ मध्ये झालेल्या ३००० आत्महत्यांपैकी २४७४ शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज थकवले होते. विशेष म्हणजे सर्वसामान्यांच्या समजुतीच्या उलट केवळ ९.८ टक्के कर्जे सावकारांची होती. याचा अर्थ असा होऊ शकतो की सावकारांकडून होणारी बाहुबलशक्ती आणि छळ ही एक मोठी प्रेरक शक्ती असू शकत नाही. ब्युरोच्या आकडेवारीनुसार शेतकरी आत्महत्या आणि कर्जबाजारीपणा यांचा घट्ट संबंध आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाले आहेत, तर या दोन राज्यांमध्येही कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे.
जगाच्या पोशिंद्याला वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी शासनाने प्रोत्साहित करायला हवे. आधुनिक पद्धतीने केलेली शेती त्यांना कमी कष्टात जास्तीचे उत्पन्न मिळवून देऊ शकते. शेतकऱ्याचे जीवन आपल्याला अनेक शिकवण देऊन जाते. त्यांचे कठीण परिश्रम आणि संयम आपण सर्वांसाठी एक एक उदाहरण आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांची जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्यांना शक्य होईल तशी मदत करायला हवी. जर काही कारणास्तव शेतकऱ्याचे पीक नष्ट झाले असेल तर त्याला आर्थिक सहाह्य करायला हवे.
शेवटी सर्व शेतकरी बांधवाना एवढाच म्हणेन की ,
बळीराजा तू नाको घेऊ फाशी
जग राहील तुजविण उपाशी!!
[शेतकरी भाषण मराठी | Farmer Speech in Marathi]
या लेखात आपण शेतकरी विषयी भाषण मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.