Police Bharti Ground Details in Marathi 2024 :पोलिस अधिकारी बनणे (पोलिस अधिकारी कसे बनायचे) हा एक महत्त्वाचा आणि सन्माननीय करिअर पर्याय आहे. गुन्हेगारी रोखणे, सुरक्षा सुनिश्चित करणे आणि सामाजिक सुरक्षा राखणे ही पोलिस अधिकाऱ्यांची मुख्य कार्ये आहेत. जर तुमचा आदर्श पोलीस अधिकारी बनण्याचा असेल तर या लेखात आम्ही तुम्हाला पोलीस अधिकारी कसे बनायचे ते सांगणार आहोत. या लेखांमध्ये करिअरबद्दल माहितीपूर्ण आणि मनोरंजक सामग्रीचे कॅप्सूल आहेत.
आणि आपण या लेखामध्ये पोलीस भरती ग्राउंड कसे असते? पोलीस भरती ग्राउंड ला किती मार्क्स असतात?, पोलीस भरती गोळा फेक गुण किती?, पोलीस भरती मध्ये सोळाशे मीटर धावण्यासाठी किती टाइमिंग असतो? पोलीस भरती फिजिकल टेस्ट मुलीसाठी कशी होते? पोलीस भरती फिजिकल टेस्ट मुलांसाठी कशी होते? पोलीस भरती ग्राउंड चाचणी मध्ये किती गुण असतात? महिला पोलीस भरती ग्राउंड? अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खाली मिळून जाईल.
Contents
पोलीस होण्यासाठी काय करावे लागते
पोलीस दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील खूप तरुण तरुणी आहोरात्र मेहनत करत असतात त्यातील काही यशस्वी होतात तर काही अपयशी. अपयशाला कधी कधी अपुऱ्या किंवा चुकीच्या माहिती कारणीभूत असतात.म्हणूनच तुम्हाला पोलीस भरती 2024 मध्ये यशस्वी होता यावे यासाठी सदर पोस्ट बनवण्यात आलेली आहे
पोलीस भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे
1. सर्वप्रथम सरकारतर्फे पोलीस भरतीची घोषणा करण्यात येते
2. पोलीस भरतीची जाहिरात वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केली जाते.
3. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि अर्जाची रक्कम भरावी लागते.
4. पात्र उमेदवारांना मैदानी परीक्षेसाठी बोलविण्यात येते.
5. मैदानी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते.
6. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
7. पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाते.
8. अंतिम यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयात 2-3 महिने प्रशिक्षण दिलं जातं.
9. मुख्यालयातील प्रशिक्षणानंतर महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर 9 महिने प्रशिक्षण दिलं जातं.
10. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयांमध्ये विविध विभागांमध्ये रुजू केलं जातं.
11. सुरक्षा देणं, विविध कार्यालयांची सुरक्षा, आरोपींना न्यायालयात नेणं, आरोपींना आरोग्य चाचणीसाठी नेणं, शस्त्रागाराची सुरक्षा यांसारखी कामे दिली जातात.
12. उमेदवारांच्या कौशल्यानुसार किंवा मधल्या काळात विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुख्यालयातून त्यांची बदली फोर्स वन, जलद प्रतिसाद पथक, लोकल क्राईम ब्रांच, पासपोर्ट डिव्हिजन, डॉग स्क्वॉड, बॉम्ब डिस्पोजल पथकामध्ये केली जाते.[पोलीस होण्यासाठी काय करावे लागते]
पोलीस भरती शारीरिक चाचणी कशी असते?
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतात
PSI ची शारीरिक चाचणी कशी होते ?- सुरवातीला तुमची शारीरिक पात्रता चेक केल्या जाते . नंतर शारीरिक चाचणीला सुरवात होते
महिलांसाठी पात्रता – महिला उमेदवार असाल तर उंची १५७ सेंटीमीटर असायला पाहिजे –
पुरुषांसाठी पात्रता – पुरुष उमेदवार असाल तर तुमची उंची १६५ सेंटीमीटर असायला पाहिजे – आणि पुरुषांची छाती सुद्धा मोजल्या जाते – तुमची छाती न फुगवता ७९ सेंटीमीटर – आणि फुगवण्याची क्षमता ५ सेंटीमीटर असायला पाहिजे
उंची कमी असली तर चालते का ? – तुमची हाईट १ मीटर ने कमी असली तरी तुम्ही disqualify होता , आणि तुमची हाईट अनवाणी मोजल्या जाते ,म्हणजे पायातले सूज काढून हाईट मोजली जाते
PSI ची शारीरिक चाचणी किती मार्कची असते ? – हि १०० गुंणांची असते आणि आता नवीन पॅटर्न नुसार शारीरिक चाचणी चे मार्क तुमच्या फायनल कटऑफ मध्ये घेतल्या जात नाहीत – म्हणजे आता हि म्हणजे हि फक्त फक्त कालिफाईंग एक्साम आहे – म्हणजे तुम्हाला शारिरीक चाचणी मध्ये ७० मार्क्स पडणे आवश्यक आहे – याठिकाणी पण तुम्हाला जर ६९ मार्क्स पडले तरी सुद्धा तुम्ही disqualify होऊ शकता
पुरुष उमेदवार शारीरिक चाचणी 2024
1600 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण गुण | 50 गुण |
महिला उमेदवार शारीरिक चाचणी 2024
800 मीटर धावणे | 30 गुण |
गोळा फेक | 20 गुण |
एकुण गुण | 50 गुण |
पोलीस भरती मैदानी चाचणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
पोलीस अधिकारी होण्यासाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
- 12 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
- पदवीधर असल्यास, प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
- मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष/ द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
- पद्वित्तीर्ण पदवी असल्यास प्रथम वर्ष /द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
- ITI/डिप्लोमा मार्कशीट
- शाळा सोडल्याचा दाखला
- शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट
- जातीचे प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
- खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
- विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
- वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र (असल्यास)
- होमगार्ड प्रमाणपत्र (असल्यास)
- आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन
- माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र (असल्यास)
- माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी एज्युकेशन (असल्यास)
- चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (निवड झाल्यावर लागेल)
पोलिसांची तयारी कशी करावी?
पोलिसांची तयारी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी, खाली दिलेल्या चरण-दर-चरण मार्गदर्शकाचे अनुसरण करा:
- पायरी-1 मूलभूत शिक्षण घ्या.
- पायरी-2: किमान आवश्यकता पूर्ण करा.
- पायरी-3 कायद्याची अंमलबजावणी परीक्षा उत्तीर्ण.
- पायरी-4: पोलीस अकादमीमधून पदवीधर असणे आवश्यक आहे.
- पायरी-5 अधिकारी म्हणून अनुभव घ्या.[पोलीस होण्यासाठी काय करावे लागते]
Police Bharti Syllabus 2024 | पोलीस भरती अभ्यासक्रम 2024
अ.क्र. | विषय | एकूण गुण | एकूण प्रश्न | एकूण वेळ |
१. | मराठी | २५ गुण | २५ प्रश्न | |
२. | अंकगणित | २५ गुण | २५ प्रश्न | |
३. | बुद्धिमत्ता चाचणी | २५ गुण | २५ प्रश्न | ९० मिनिटे |
४. | सामान्यज्ञान+चालू घडामोडी | २५ गुण | २५ प्रश्न | |
एकूण | १०० गुण | १०० प्रश्न |
police bharti books। पोलीस भरती महत्वाची पुस्तके
अ.क्र. | विषय | पुस्तक नाव |
१. | मराठी | बाळासाहेब शिंदे/मो.रा.वाळिंबे |
२. | अंकगणित | पंढरीनाथ राणे/नितीन महाले/सतीश वसे |
३. | बुद्धिमत्ता चाचणी | अनिल अंकलगी /पंढरीनाथ राणे/सतीश वसे |
४. | सामान्यज्ञान+ चालू घडामोडी | तात्यांचा ठोकला लक्ष्यवेध इ. |
एकूण | १०० प्रश्न |
महाराष्ट्र पोलिसांना पगार किती असतो?
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलला पगार ५२००रु. – २०२००रु. (भत्ते वगळता)व ग्रेड पे २००० रु. .हा पगार जिल्ह्या नुसार बदलतो.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस प्रमुख कोण आहेत?
सध्या पोलीस प्रमुख म्हणजेच पोलीस महासंचालक ह्या श्रीमती. रश्मि शुक्ला ह्या आहेत.
श्रीमती. रश्मि शुक्ला ह्या ०९ जानेवारी २०२४ पासून पोलीस महासंचालक ह्या पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या आधी श्री. विवेक फणसळकर हे ०९ जानेवारी २०२४ पर्यंत पोलीस महासंचालक ह्या पदावर होते.त्यांच्या कडून दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी श्रीमती. रश्मि शुक्ला यांना पदभार सोपवण्यात आला.
वयाची अट (Police Bharti Maharashtra Age Limit) :
पोलीस भरतीमध्ये वेगवेगळे पदे असणार आहेत आणि त्या प्रत्येक पदासाठी वयाची अट वेगळी असू शकते त्याबद्दलची माहिती लवकरच अपडेट करण्यात येईल.
उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी खालील प्रमाणे.
खुला प्रवर्ग | 18 ते 28 वर्ष |
मागासवर्गीय प्रवर्ग | 18 ते 33 वर्ष |
SRPF पदासाठी (खुला प्रवर्ग) | 18 ते 25 |
SRPF पदासाठी (मागासवर्गीय) | 18 ते 30 वर्ष |
सूचना : वयाची अट वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वेगवेगळी असणार आहे त्यासाठी जाहिरातीची पीडीएफ वाचा.
हे पण वाचा
- IPS Full Form in Marathi | IPS म्हणजे काय संपूर्ण माहिती ?
- Ration Card Download 2024 | घर बसल्या राशन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करा
- प्रधानमंत्री आवास योजना नवीन यादी | PM Awas Yojana New List 2024
- Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
- छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण |अतिशय सुंदर आणि जबरदस्त मराठी भाषण
- गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi 2023 | अप्रतिम मराठी भाषण
- The Most Accurate Actual size of Online Ruler