Dr Babasaheb Ambedkar Bhashan in Marathi नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये Dr Babasaheb Ambedkar जयंती निमित्त अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आज आपण या लेखामध्ये Dr Babasaheb Ambedkar जयंती निमित्त भाषण मराठीमध्ये बघणार आहोत आपण पाहणार आहोतभीमजयंतीसाठी अतिशय सुंदर मराठी भाषण
Contents
Dr Babasaheb Ambedkar Bhashan in Marathi
भाषण सुरू करण्यात अगोदर सर्वप्रथम भाषणामध्ये या महत्त्वाच्या ओळी असाव्यात जेणेकरून भाषणाची सुरुवात चांगली होते .
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो
आज का दिन है बड़ा महान
बनकर सूरज चमका इक इंसान
कर गये सबके भले का ऐसा काम
बना गये हमारे देश का संविधान
सर्वप्रथम सर्वांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पंकज आहे
आज 14 एप्रिल आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करिता होत
प्रथम सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
बालपण :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण संघर्षांनी व निष्ठुरतेने चिरचिटले होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या गावी झाला होता. त्यांचे पूर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर होते. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई होते.
बालपणात त्यांना खुप कठीण वेळेला सामोरे जावे लागले. त्यांचा जन्म एक शूद्र समाजात झाल्यामुळे त्याना अस्पृश्य मानले जायचे। त्यांच्या शालेय जीवनामध्ये त्यांना अस्पृश्यतेचा पहिला चटका लागला जेव्हा त्यांना त्यांच्या संवर्गीय मुलांसोबत बाकावर न बसवता वर्गाच्या बाहेर जमिनीवर बसायला लागले। शाळेतील मुले त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तर ते अंघोळ करायचे.पण बाबासाहेबांनी ते निमुटपणे सहन केले।
शिक्षण (Education):
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे सैन्यामध्ये सुभेदार होते। त्यांची बाबासाहेबांनी खुप शिकावे अशी इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. त्यात बबसाहेबांना सुद्धा शिक्षणाची गोडी लागली त्यामुळे त्यांनी अनेक हाल अपेष्टा, आपमान सहन करत आपले शिक्षण सुरूच ठेवलेते जेव्हा इंग्रजी चौथीची परीक्षा पास झाले होते तेव्हा त्यांना केळुस्कर यांनी बक्षीस म्हणून बुद्धांच्या जीवनावरील चरित्र हे पुस्तक भेट म्हणून दिलं होत..
डॉ. आंबेडकरांनी 1907 मध्ये मॅट्रिक पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र मध्ये बी.ए. केले. त्या वेळी त्यांनी शाहू महाराज्यांच्या मदतीने कोलंबिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि 1927 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी पदवी देखील मिळवली. ते तब्बल 64 विषयांमध्ये पारंगत होते. त्याना 11 भाषाही प्रगल्भपणे बोलता येत होत्या. अशा प्रकारे ते आपले शिकण करणारे पहिले दलित विद्यार्थी झाले। डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला. रमाबाई ह्या गरीब घराण्यातील होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या शिक्षणात मदत केली. रमाबाईंनी सोन्या-चांदीची कधी आशा केली नाही. कपाळाचं कुंकू हेच त्या आपला दागिना समजत असतं.
समाजसुधारणा (Social Reform):
परदेशातून आल्यानंतर त्यांनी बड़ोदयामधे नोकरी केली परंतु तेथे ते मोठ्या पदावर काम करत असून सुद्धा त्यांना चांगली वागणूक दिली जात नव्हती। म्हणून त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग या देशातील रंजले गांजलेल्यांसाठी, अस्पृश्यांसाठी करण्याचे ठरवले। 1923 मध्ये, डॉ बीआर आंबेडकर यांनी “बहिष्कृत हितकारिणी सभा” ची स्थापना केली ज्याचा उद्देश शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता पसरवणे आणि आपल्या देशातील निम्न-वर्गीय लोकांची आर्थिक स्थिती वाढवणे हा होता .
dr babasaheb ambedkar speech in marathi
“शिका – संगठित व्हा व् संघर्ष करा ” या घोषणेखाली त्यांनी भारतातून जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी एक सामाजिक चळवळ देखील चालवली. सर्व मानवांच्या समानतेच्या नियमाचे पालन करून भारतीय समाजाची पुनर्बांधणी करण्याची त्यांची इच्छा होती. 1927 मध्ये अस्पृश्य लोकांसाठी समान हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महाड, महाराष्ट्र येथे मोर्चाचे नेतृत्व केले. दलितांना “सार्वजनिक चवदार तलाव” च्या पाण्याला स्पर्श करण्यास किंवा चाखण्याची परवानगी नव्हती. जातीविरोधी, पुजारीविरोधी आणि मंदिर प्रवेशाच्या आंदोलनासारख्या सामाजिक चळवळी त्यांनी सुरू केल्या . 1930 मध्ये त्यांनी काळाराम मंदिर, नाशिक, महाराष्ट्र येथे मंदिर प्रवेश आंदोलनाचे नेतृत्व केले. ते व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते आणि 1942 मध्ये, ते निम्न-वर्गीय लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर बदल करण्यात गुंतले.
संविधान संघटना आणि राज्यघटना:
Dr Babasaheb Ambedkar Bhashan in Marathi
भारताच्या संविधान निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात। ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी विविध देशाच्या संविधानाचा गूढ़ अभ्यास केला व २ वर्षे ११ महिने १८ दिवस मेहनत घेवून राज्यघटना तयार केली. शिवाय, आंबेडकरांनी एक मजकूर तयार केला ज्यामध्ये संवैधानिक संरक्षण आणि नागरी स्वातंत्र्याच्या श्रेणीची हमी दिली गेली. आंबेडकरांच्या बुद्धिचतुर्यामुळे आज भारतीय संविधानाला जगातील सर्वोत्कृष्ट संविधान मानले जाते .
धर्मांतर :
डॉ. आंबेडकर 1947 मध्ये कायदा मंत्री झाले. कायदामंत्री असताना त्यांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडले, यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या हक्कांविषयीची समानतेविषयीची भूमिका मांडली मात्र तत्कालीन सर्व नेत्यांनी या बिलाचा कडाडून विरोध केला. बिल संसदेत मंजूर न झाल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू धर्मामधे अस्पृश्यता कायम राहिल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला।आणि त्यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर 200000 अनुयायी दलितांसह बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली. “बुद्ध आणि त्यांचा धर्म ” हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं शेवटचं पुस्तक या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्माबद्दल सविस्तर माहिती दिली आहे खऱ्या अर्थानं या पुस्तकामुळे जगाला बुद्ध नव्याने कळले
महापरिनिर्वाण:
प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीमध्ये ६ डिसेंबर १९५६ साली बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. या महामानवाच्या अंतयात्रेमध्ये १० ते १२ लाख नागरिक सामिल झाले होते असे इतिहासात नमूद आहे. डॉ. आंबेडकर यांचा अंतिम दिवस आणि महापरिनिर्वाण एक महत्त्वपूर्ण संदर्भ आहे. त्यांनी आपल्या जीवनात जातिवाद, असमानता आणि न्यायाच्या मूल मुद्द्यांवर संघर्ष केला आणि एक समाजातील समानता आणि न्याय कसा स्थापित करावा हे लक्ष्य साधले. बी.आर. आंबेडकर हे भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. डॉ भीमराव आंबेडकरांना १९९० एप्रिलमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी “भारतीय मजूर पक्ष” म्हणून ओळखला जाणारा राजकीय पक्षही स्थापन केला. आपल्या देशातील तरुणांसाठी ते खरे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा वाढदिवस आंबेडकर जयंतीच्या रूपाने अभिमानाने साजरा केला जातो यात आश्चर्य नाही. या महान भारतीय देशभक्ताचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सदैव जिवंत राहील.
अशा या महान महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो
जय भीम जय सविधान धन्यवाद
या लेखात आपणdr babasaheb ambedkar speech in marathi मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
Related content
- [500+] Marathi Suvichar | Chote suvichar Marathi | छोटे सुविचार मराठी
- सुंदर Resume कसा लिहावा | Resume लिहिण्याच्या भन्नाट टिप्स | Resume Writing for Job Tips 2024
- 25+ Bhavpurna Shradhanjali Banner In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मराठी बॅनर
- [150+]Bhavpurna Shradhanjali In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
- 1000+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी 2024 | GK Questions and Answers in Marathi