Lokmanya Tilak Speech In Marathi:’लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मराठी भाषण’

Lokmanya Tilak Speech In Marathi : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आज आपण या लेखामध्ये लोकमान्य  बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त भाषण मराठीमध्ये बघणार आहोत.

भाषण सुरू करण्यात अगोदर सर्वप्रथम भाषणामध्ये या महत्त्वाच्या ओळी असाव्यात जेणेकरून भाषणाची सुरुवात चांगली होते .

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच .”

                                  अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य  बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिवस या निमित्ताने येथे जमलो आहोत ता आपण माझे भाषण शांतचित्ताने ऐकून ग ही नम्र विनंती .

                               जरी माझे शरीर म्हातारे  झाले असले तरी आत एक तरूण अजूनही जगतो आहे. जे काही मी आज बोलत आहे ते माझ्यातील तरूणास वाटत आले आहे. शरीर जरी क्षीण आणि कमजोर आणि नाशवंत असू शकते परंतू शरीरात वास करणारा आत्मा नेहमी तरूण असतो याच प्रकारे आपले स्वराज्यामधील क्रियाकरणात नक्कीच गती मंद होईल तेव्हा आपल्या अंतरआत्म्याची स्वतंत्रता शाश्वत आणि अविनाशी न राहता तीचे दमन होईल आणि आपण स्वतःस गुलाम समजू. स्वतंत्रता आपला जन्मसिध्द अधिकार आहे जेव्हा पर्यंत ही माझ्यात जिवंत आहे मी म्हातारा होणार नाही. स्वतंत्रता हया भावनेस कोणी हत्याराने कापू शकत नाही अग्नीने जाळू शकत नाही तर पाण्यात बूडवूही शकत नाही. कोणी हवेत उडवू शकत नाही.

आपण आपले स्वराज्य मागतो आहे आणि आपण यास नक्कीच प्राप्त करू. अशे ठामपणे सांगून तारूण क्रांतिकारी युवकांचे रक्त साल्सावणारे नेते बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म  23 जुलाई 1856 रोजी महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. टिळकांचे लहान पणाचे नाव केशव असे होते. केशव ही टिळक घराण्याची कुलदेवता होती म्हणून केशव असे नाव ठेवले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते.

                            आपल्या मित्रांसोबत ते कुस्ती सारखे खेळ खेळायचे. त्यामुळे त्यांची तब्बेत ठणठणीत झाली होती.  पुढे त्यांनी आपल्या मित्रांसोबत १९८० मध्ये ” डेक्कन एज्युकेशन सोसायटी ”  ची  स्थापना  केली.  भारतीय  मुलांना  चांगले  शिक्षण  मिळावे हा त्यांचा हेतू होता. टिळक हे भारतीय लोकांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे कट्टर समर्थक होते. त्यांनी ब्रिटीश राजवटीच्या दडपशाही कायद्यांपुढे उभे राहून अस्पृश्यता आणि बालविवाह यासारख्या सामाजिक समस्यांविरुद्ध लढा दिला. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना वास्तविक सामाजिक न्यायाचे वकील ही पदवी मिळाली.[Lokmanya Tilak Speech In Marathi लोकमान्य टिळक भाषण लहान मुलांसाठी]

                        टिळकांनी य पत्रकार म्हणून देखील काम पाहिले. आपली पत्रकारिता करत असताना वर्तमानपत्रे, मासिके यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय चळवळी उभारल्या लोकांमध्ये देशप्रेम व समाजभान निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा यासारखी वर्तमानपत्रे सुरू केली.  आपल्या जहाल अशा कलमाने अग्रलेख लिहून इंग्रजांवरती सडकून टीका त्यांनी केली .लोकमान्य टिळकांविषयी अजून सांगायचे झाले तर, या इंग्रजांना म्हणजे ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावले पाहिजे असे ठाम भूमिका लोकमान्य टिळक यांनी घेतली होती. परंतु सर्व लोकांना एकत्र कसे आणायचे कसे? या कल्पनेतूनच त्यांनी शिवाजी महाराज जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव यासारखे कार्यक्रम किंवा उत्सव सुरू केले. या उत्सवांमुळेच लोक एकत्र येऊ लागले.

दुष्काळ सगळीकडे असताना प्लेग हा महारोग पसराय सुरुवात झाली .प्लेगचा महाभयंकर असा संसर्गजन्य रोग आणि दुष्काळग्रस्त परिस्थिती अशावेळी इंग्रज सरकार भारतीय लोकांवर अन्याय जुलम करत होते.”दुष्काळ विमा निधी” यामधून इंग्रज सरकार भारतीय जनतेकडून पैसा गोळा करण्याचे काम करत होते; म्हणून या निधीचा वापर लोकांसाठी करावा असा टिळकांचा आग्रह होता.त्यांनी इंग्रजांना सडेतोडपणे उत्तरही दिले.काही ठिकाणी टिळकांनी दुकानदार यांना लोकांना अन्नधान्य देण्यास सांगितले.  आणि यातूनच अप्रत्यक्षरीत्या पडद्यामागून स्वातंत्र्याचा लढा तीव्र होत गेला .

ref img from : https://scroll.in/

[Lokmanya Tilak Speech In Marathi]

                                            या साथीच्या रोगाला वेळीच आळा घातला पाहिजे, म्हणून ब्रिटिश अधिकारी रॅण्ड यांची नेमणूक करण्यात आली. रॅनडच्या आदेशानुसार सैन्यांनी रोगग्रस्त लोकांना वेगळे करणे चालू केले, शिवाय लोकांवर अत्याचार करू लागले; म्हणून टिळकांनी आपल्या वृत्तपत्रातून त्यांच्यावर शाब्दिक मारा चालू ठेवला. या घटनेचाच राग मनात धरून दामोदर चाफेकर यांनी 23 जून 897 रोजी रॅन्ड व त्याचा सहकारी आयरिष्ट यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आली.लोकमान्य टिळक यांनाही या त्यांच्या आरोपाखाली आरोप करण्यात आला पण पुरावा सिद्ध न झाल्याने त्यांना तुरुंगात नेऊ शकले नाहीत, यावर टिळकांनी केसरीमध्ये “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय” असा अग्रलेख लिहिला आली.  लोकमान्य टिळक आपल्या वर्तमानपत्रातून इंग्रज सरकारवर कायम टीका करीत होते, म्हणूनच ब्रिटिश सरकारने त्यांना 1897 साली राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली जवळजवळ दीड वर्ष तुरुंगामध्ये ठेवले. हा राजगृहाचा खटला बरेच दिवस चालला आणि राजगृहाच्या गुन्ह्याबद्दल  त्यांना मंडले या तुरुंगात सहा वर्ष तुरुंगवास देखील भोगाव लागला.[Lokmanya Tilak Speech In Marathi]

                                          लोकमान्य टिळक हे आणि बेझंट यांच्या कार्याने प्रेरित झाले. आणि म्हणूनच त्यांनी होमरूल लीग संघटनेची स्थापना केली. टिळकांचे भाषेविषयीचे योगदान सांगायचे झाले तर हिंदी आपली राष्ट्रभाषा बनायला हवी. यासाठी त्यांनी हट्ट धारला आणि म्हणूनच हिंदी आपली राष्ट्रभाषा बनली.अखिल भारतामध्ये राष्ट्रप्रेम, देशप्रेम किंवा राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याचे कार्य लोकमान्य टिळक यांनी केले. म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. इंग्रजांविरुद्ध प्रचंड जनक शोक तयार करण्याचे काम कोणी केले असेल ते लोकमान्य टिळकांनी आणि त्यांच्या या विचारांमुळेच भारतातील जनता ही त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याला खूप मोठा पाठिंबा देत होती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायच असेल तर आपल्या भारतीय जनतेने, भारतीय तरुणांनी काय केले पाहिजे? याविषयी एके ठिकाणी लोकमान्य टिळक म्हणतात, ”गरम हवेच्या लाटांना सामोरे न जाता, कष्ट न करता, तळपायाला फोड न येता, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही.” कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. यातून लोकमान्य टिळक किती प्रयत्नवादी होते. कष्टांना महत्त्व  देणारे होते हे आपल्याला दिसून येते.

                                         असे हे महान व्यक्तिमत्व इंग्रजांशी कडा संघर्ष देत असताना आपल्या लेखणीच्या,आंदोलनाच्या माध्यमातून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे लोकमान्य टिळक 1920 साली आसमंतात  विलीन झाले. खरोखरच तो दिवस इतिहासातील एका अतिशय दुःखद असा दिवस होता. की ज्या व्यक्तिमत्त्वाने देशाला स्वाभिमान शिकवला. ते व्यक्तिमत्व आपल्याला सोडून कायमचे गेले.     

अशा या महान नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम .

जय हिंद जय महाराष्ट्र !

या लेखात आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती भाषण मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

हे पण वाचा :

Share With Your Frends

Driven by a passion for writing and a thirst for knowledge, Rutuja Waghmare is embarking on a journey into content creation while actively exploring job opportunities and educational pathways. With a dedication to learning and a keen interest in content creation, she aims to provide valuable insights through engaging articles and blog posts. Eager to connect and grow, Rutuja is committed to sharing information on career development and educational opportunities.

1 thought on “Lokmanya Tilak Speech In Marathi:’लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मराठी भाषण’”

Leave a Reply