Talathi Selection Process : नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे Naukaricenter.com या ब्लॉग मध्ये नक्की तलाठ्याची निवड कशी होते ? प्रमोशन होतं का ? त्यानंतर ट्रेनिंग असते का नियुक्ती कशाप्रकारे होते नेमणूक त्यांची कोण करतो ?त्यानंतर त्यांची वयोमर्यादा काय असायला हवी ? शैक्षणिक पात्रता काय असायला हवी ?तलाठ्याची नक्की कोणती कामे असतात काय कर्तव्य ते पार पाडतात ? त्यांना वेतन किती असतो ? सविस्तारित्या संपूर्ण माहिती आपण आजच्या आर्टिकल च्या माध्यमातून बघणार आहोत
Contents
काय आहे तलाठी पद ? :
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ७(३) नुसार प्रत्येक सजाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमले जातात. तहसीलदारालाच ‘मामलेदार’ असेही म्हंटले जाते.1918पासून शाहू महाराजानी पगारी तत्त्वावर तलाठी नेमण्यास सुरवात केली होती.तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यास आहेत. तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षांद्वारे केली जाते.
काही राज्यांमध्ये पटवारी किंवा ग्राम लेखापाल म्हणूनही तलाठ्याला ओळखले जातेतलाठी हा खालच्या दर्जाचा प्रशासकीय अधिकारी असतो जो तहसीलदारांच्या देखरेखीखाली काम करतो. तलाठी हे गाव किंवा तहसील स्तरावरील महसूल प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजासाठी जबाबदार असतात. चला तलाठ्याच्या प्रमुख जबाबदाऱ्या जाणून घेऊया:
तलाठ्यांची काम (कर्तव्ये)काय असतात :
- जमीन महसुलाबाबत पहिला अर्ज सर्वप्रथम तलाठी बघतो. त्यावर योग्य तो निर्णय घेऊन मग तो पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो.
- गावपातळीवरील महसूल खाते सांभाळणे.
- जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर निश्चित केलेली नोंदणी पुस्तके, अभिलेख ठेवण्याचे कार्य तलाठी करतो.
- गावपातळीवर जमीन महसूल थकबाकीदार व जमिनीच्या अधिकारपत्राची नोंद ठेवण्याची जबाबदारी तलाठ्याची असते.
- गावपातळीवर शेतजमीनीचा आकार ठरविण्याचा अधिकार तलाठ्यास आहे.
गावातील जमीनधारकांच्या नोंदी ठेवण्याचे काम तलाठी करतो.
तलाठ्याला किती मिळते सॅलरी :
तलाठी: ₹5,200 – ₹20,200 + ग्रेड पे ₹2,400
तलाठी (प्रशिक्षण कालावधी): ₹9,300 – ₹34,800 + ग्रेड पे ₹4,200
तलाठी हा महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल विभागातील सरकारी कर्मचारी आहेतलाठ्याचे पगार हे ठिकाण आणि सेवा वर्षांवर अवलंबून बदलू शकतात. तलाठ्यांची पगार रचना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित आहे आणि सरकारी नियमांनुसार त्यात बदल होऊ शकतो.
तलाठ्याला किती वयाची अट असते –
- General- 19 ते 38 वर्षांच्या वयोमर्यादेत असावे.
- आरक्षित श्रेणीतील उमेदवार(SC/ST)- 19 ते 43 वर्षांच्या वयोमर्यादेत असावे.
- मागासवर्गीय / क्रीडापटू – 05 वर्षांची सवलत.
- प्रकल्प प्रभावित / भूकंप प्रभावित उमेदवार / अपंग – 07 वर्षांची सवलत.
शैक्षणिक पात्रता काय असते –
- भारत सरकारने मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून कोणत्याही क्षेत्रातील पदवी (ग्रॅजुएशन) असावी.
- MSCIT किंवा कम्प्युटरचा (MS-CIT) कोणताही कोर्स केलेला असावा.
- उमेदवाराला मराठी आणि हिंदी या भाषांचे चांगले ज्ञान असावे.
Talathi Syllabus 2024 | तलाठी अभ्यासक्रम 2024 :
तलाठी भरतीसाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम हा एकूण चार विषयांमध्ये विभागला आहे .इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी.
तलाठी परीक्षेसाठी Negative Marking System असणार आहे, म्हणजे चुकीच्या प्रश्नासाठी मार्क कट केले जाणार आहे.
यामध्ये सर्व पेपर साठी प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातात, प्रती प्रश्न 2 मार्क असतात, म्हणजे एकूण 100 प्रश्न आणि त्यांचे एकूण गुण मार्क्स 200 होतात.
विषय | मार्क्स |
मराठी | 50 |
इंग्रजी | 50 |
सामान्य ज्ञान | 50 |
बौद्धिक चाचणी | 50 |
total | 200 |
Talathi Selection process (तलाठी निवड प्रक्रिया):
- जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते.
- या परीक्षेसाठी पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम
- जिल्हा निवड समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड
समिती असते. या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात
प्रसिद्ध करून अर्हता प्राप्त उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात.
लेखी परीक्षा (Writeen Exan (Online))
मुलाखत (i nterview)
Document Verification
अर्ज सादर केल्यानंतर शासनाद्वारे आलेल्या अपडेट नुसार लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहे, लेखी परीक्षा ऑनलाईन सुरुवात पार पडणार आहे TCS किंवा इतर कोणत्याही Online Platform वर ही Exam Conduct केली जाणार आहे.
लेखी परीक्षा मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल, मुलाखत योग्यरीत्या पार पडल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे Document Verification होईल. जर उमेदवार या दोन्हीही स्टेजमध्ये पास झाले, तर त्यांची पदासाठी नियुक्ती केली जाते
हे पण वाचा :
- IAS Selection Process 2024 : IAS अधिकारी व्हायचंय? कलेक्टर बनण्यासाठी काय करावे
- IPS Selection Process: IPS बनण्यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया, आणि तयारीसाठी आवश्यक माहिती
- Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
- Tehsildar Selection Process : तहसीलदार बनण्यासाठी काय करावे ?
- Lokshahir Annabhau Sathe Speech in Marathi:’लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाषण’
- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण;’Savitribai Phule Jayanti Speech in Marathi’
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण;’Swami Vivekanand Speech in Marathi 2024′
- The Most Accurate Actual size of Online Ruler
आपल्याला सरकारी नोकर्याच्या संदर्भात आणखी माहिती आवश्यक आहे तर, कृपया नौकरीची अधिसूचना पहा, त्याची माहिती आपल्या मित्रांसोबत सामायिक करा आणि त्यांना सरकारी नोकर्याच्या संधी मिळवण्यात मदतीची करा. इतर सरकारी नोकर्यांसाठी मराठीतील फुलेरडी नोकर्यांसाठी दिनचर्या naukaricenter.com ला भेट द्या.”