Gram sevak Selection Process in Marathi : नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे Naukaricenter.com या ब्लॉग मध्ये नक्की ग्रामसेवक निवड कशी होते ? प्रमोशन होतं का ? त्यानंतर ट्रेनिंग असते का नियुक्ती कशाप्रकारे होते नेमणूक त्यांची कोण करतो ?त्यानंतर त्यांची वयोमर्यादा काय असायला हवी ? शैक्षणिक पात्रता काय असायला हवी ?ग्रामसेवक नक्की कोणती कामे असतात काय कर्तव्य ते पार पाडतात ? त्यांना वेतन किती असतो ? सविस्तारित्या संपूर्ण माहिती आपण आजच्या आर्टिकल च्या माध्यमातून बघणार आहोत
पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी ‘लोकशाही संस्था’ म्हणजे ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता, सरपंच सोबत ग्रामसेवकालाही महत्वाची भूमिका बजावावी लागते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्राम विकास अधिकारी Village Development Officer अशा नावांनी देखील ओळखले जाते .
मागील ३ वर्षांपासून ग्राम सेवक भरती झालेली नाही , जिल्हा परिषदेतील ८७५ जागांच्या पद भरतीला ऑक्टोम्बर २०२३ पासून सुरुवात झाली होती परंतु नॉन पेसा सेक्टर मधील जागेचा मुद्दा न्यायालयात गेल्याने आरोग्य सेवक पुरुष व महिला तसेच ग्रामसेवकांच्या पद भरतीला ब्रेक लागलेला .परंतु नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांची परिक्षेचे वेळापत्रक जाहिर करावे, अशा सुचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामसेवकांच्या पदासाठी १६१ जागा निघाल्या आहेत .
त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांना देखील हे आर्टिकल नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पण ग्राम सेवक होण्यासाठी काय करावे लागते? याची माहिती मिळून जाईल.
Contents
ग्राम सेवकाची कामे ?
ग्रामसेवकाला गावाच्या विकासाच्या दृष्टीने, विकासकामांचे नियोजन, ग्रामपंचायत निधी, ग्रामसभा अहवाल, ठरावांची अंमलबजावणी, पत्रव्यवहार, शासकीय योजनेचे व्यवस्थापन इत्यादी सारख्या अनेक जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडाव्या लागतात.
- संबधित गावांकरिता जन्म, मृत्यू, विवाह इ. नोंद ठेवणे.
- संबधित ग्रामपंचायतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे.
- संबधित गावांकरिता पाणीपट्टी , घरपट्टी इ. करांची वसूली करणे.
- ग्रामपंचायतीच्या सभा, व ग्रामसभांना वेळोवेळी उपस्थित राहून इतिवृत लेखन केले पाहिजे.
- ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे महत्त्वपूर्ण काम ग्रामसेवकास असतातच.
- पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गदशन करणे ग्रामसेवकाचे कर्तव्य.
- याशिवाय विस्तार अधिकार्यांच्या सल्ल्यावरुन ग्रामसेवक गावात इतर योजनांची माहिती देतो व त्यासंदर्भात अंमलबजावणी करतो.
- ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण गट विकास अधिकार्यांचे व त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे म्हणजे सीईओ यांचे असते.
- या गोष्टींकरता प्रत्येकासाठी अंमलबजावणी करणे हे प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे करणे गरजेचं आहे व हे ग्रामसेवकाचे परम कर्तव्यच आहे.
- कर्तव्यतत्पर राहण्यासाठीसुद्धा प्रत्येक ग्रामसेवकांना संबधित गावामध्ये राहण्यासाठीसुद्धा नियम व सक्तीच असते. अन्यथा गावातील सदस्य किंवा सरपंच याबद्दल तहसिलदार यांच्याकडे कायदेशीर तक्रार करु शकतो.
यांसारखी अनेक कामे ग्रामसेवकाला करावे लागतात .
Gram sevak Education Details (शैक्षणिक पात्रता निकष) :
- ग्राम सेवक पदासाठी कमीत कमी शिक्षण १२ वी कमीत कामी ६० % नी पास असणे आवश्यक आहे .
- उमेदवार हा पदवीधर असेल तर वरील निकष लागू नाही होणार .
- कोणत्याही क्षेत्रातील पदवीधारक उमेदवार पदासार्गि अर्ज करू शकतात .
- परंतु कृषी क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रातील विषयामध्ये पदविका किंवा पदवी झालेली असेल तर अर्जदाराला प्राधान्य दिले जाईल .
Gram sevak Age Limit (वयोमर्यादा निकष) :
- शासनाने ठरविल्याप्रमाणे ग्रामसेवक भरतीसाठीही वयोमर्यादा आहे. –
- त्यासाठी तुमचे वय कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त ३८ वर्षे असावे.
- इतर प्रवर्गातून अर्ज केल्यास वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे ,
- आणि राखीव प्रवर्गातून ३ ते ५ वर्षांची सवलत दिली जाते.
Gram sevak Exam Details :
ग्रामसेवक भरतीसाठी एकूण मराठी इंग्लिश, अंकगणित व बुद्धिमत्ता , सामान्य ज्ञान व कृषी आणि तांत्रिक असं ५ विषय असतात .ऐकू 200 मार्काची लेखी परीक्षा असते, प्रश्नांची संख्या ही शंभर असते आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क दिले जातात, त्यानुसार पेपर 200 मार्काचा असतो.
मुख्य बाब म्हणजे ग्राम सेवक भरती साठीचा पेपर हा MCQ Objective Type स्वरुपात असतो.यात Negative Marking System न नाहीये, जरी एखादा प्रश्न चुकला तर त्यासाठी अधिकचे मार्क कट केले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला पूर्ण पेपर सोडवता येणार आहे, यामुळे तुमच्या Passing ची शक्यता वाढण्यास मदत होते.
- मराठी (15 प्रश्न)-30 गुण
- इंग्रजी (15 प्रश्न)-30 गुण
- अंकगणित व बुद्धिमत्ता (15 प्रश्न)-30 गुण
- सामान्य ज्ञान (15 प्रश्न)-30 गुण
- कृषी आणि तांत्रिक (40 प्रश्न) – 80 गुण
परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
Gram sevak Exam Syllabus :
इंग्रजी | General Vocabulary (Synonyms and Antonyms) Sentence structure (Types or Sentence, Error Detection) Grammar (Parts of Speech, Subject Verb Agreement, Tense, Direct Indirect Speech, Voice) Use of Idioms and Phrases and their meaning Comprehension of passage |
मराठी | सर्वसामान्य शब्दसंग्रह (समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द) वाक्यरचना (वाक्र्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे) व्याकरण (शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, काळ, अलंकार) म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग उताऱ्यावरील प्रश्न |
अंकगणित व बुद्धिमत्ता | सामान्य बुद्धीमापन व आकलन तर्क आधारित प्रश्न अंकगणित आधारित प्रश्न |
कृषी आणि तांत्रिक | अ. समाजशास्त्र विषयक ज्ञान समाज मानसशास्त्र समुदाय संस्था समाजसुधारकांचे योगदान सामाजिक समस्या सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे ब. पंचायतराज व्यवस्था 73 वी घटनादुरुस्ती महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण) क. कृषी विषयक ज्ञान कृषी मुलतत्वे पीक उत्पादन तंत्रज्ञान फलोत्पादन पीक संरक्षण कृषी औजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पध्दती कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान सहकार पतपुरवठा पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग सेंद्रिय शेती कृषी आधारित उद्योग मृद संधारण, जल संधारण व जल व्यवस्थापन पर्यावरणीय बदल ड. इतर आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना मुलभूत संगणक ज्ञान माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 जैव विविधता सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन |
सामान्य ज्ञान | चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध कृषि आणि ग्रामीण विकास संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये आधुनिक भारताचा इतिहास भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना संघटन, कार्ये महाराष्ट्रातील समाज सुधारक |
Gram sevak Selection Process :
ग्रामसेवक भरती अंतर्गत अर्जदार उमेदवारांची निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे असणार आहे . यामधे काही टप्पे देण्यात आले आहेत, त्यानुसार जे उमेदवार या सर्व स्टेज मध्ये उत्तीर्ण होतील केवळ त्यांना ग्राम सेवक पदावर नियुक्ती मिळणार आहे.
- ग्रामसेवक भरतीसाठी सर्वप्रथम अर्जदाराची पात्रता तपासली जाते .
- जर उमेदवार पात्रतेच्या मापात बसत असेल तर त्याला लेखी परीक्षा द्यावी लागते .
- परीक्षेत पास झाल्यावर उमेदवाराचे document verification केले जाते
- जर कदपत्रे बरोबर असतील तर मेरिट लिस्ट जाहीर करून त्यातील निवडलेले आणि पात्र उमेदवार ग्रामसेवक पदावर रुजू हातात
हे पण वाचा :
- IAS Selection Process 2024 : IAS अधिकारी व्हायचंय? कलेक्टर बनण्यासाठी काय करावे
- IPS Selection Process: IPS बनण्यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया, आणि तयारीसाठी आवश्यक माहिती
- Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
- Tehsildar Selection Process : तहसीलदार बनण्यासाठी काय करावे ?
- Lokshahir Annabhau Sathe Speech in Marathi:’लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाषण’
- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण;’Savitribai Phule Jayanti Speech in Marathi’
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण;’Swami Vivekanand Speech in Marathi 2024′
- The Most Accurate Actual size of Online Ruler
आपल्याला सरकारी नोकर्याच्या संदर्भात आणखी माहिती आवश्यक आहे तर, कृपया नौकरीची अधिसूचना पहा, त्याची माहिती आपल्या मित्रांसोबत सामायिक करा आणि त्यांना सरकारी नोकर्याच्या संधी मिळवण्यात मदतीची करा. इतर सरकारी नोकर्यांसाठी मराठीतील फुलेरडी नोकर्यांसाठी दिनचर्या naukaricenter.com ला भेट द्या.”