Mahatma Gandhi Speech in Marathi |’महात्मा गांधी मराठी भाषण’

Mahatma Gandhi Speech in Marathi : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्त अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आज आपण या लेखामध्ये महात्मा गांधी मराठी भाषण मराठीमध्ये बघणार आहोत.

भाषण सुरू करण्यात अगोदर सर्वप्रथम भाषणामध्ये या महत्त्वाच्या ओळी असाव्यात जेणेकरून भाषणाची सुरुवात चांगली होते .

सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो

या संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधीजी. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर सुद्धा मोठ्यात मोठी लढाई जिंकता येते. असा महत्वाचा संदेश भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने जगाला दिला. आणि अश्या ह्या शांततापूर्वक आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते होते ” महात्मा गांधी”.

२ ऑक्टोबर १८६९ रोजी जगातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिक म्हणजेच महात्मा गांधी यांचा जन्म झाला. ‘शब्दांमध्ये वाईटाचे चांगल्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते’,असा विश्वास बाळगणार्‍या गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली. जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा, नैतिक मूल्ये आणि नैतिकतेने होऊ शकते असे त्यांनी नेहमी सगळ्यांना संगितले. .

महात्मा गांधीजीचे बालपण :

महात्मा गांधीजी त्यांच्या बालपणी त्यांची आई त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे पण त्यांना श्रावणबाळाची गोष्ट जास्त आवडायची. ते पण म्हणायचे की मोठा होऊन मी श्रावण बाळाप्रमाणे आई वडिलांची सेवा करणार. दुसरी त्यांची आवडीची गोष्ट म्हणजे राजा हरिश्चंद्रची गोष्ट. हरिश्चंद्र राजाचा सत्यासाठी सर्वस्व त्याग करण्याचा गुण त्यांना आवडला. त्यांनी ठरवले की आयुष्यभर आपण सत्य बोलायचे. लहानपणा पासून त्यांना शांतता, अहिंसा जास्त प्रिय होती. त्यांचा भाऊ त्यांच्या खोड्या काढायचा तेव्हा आई म्हणायची की तू पण त्याला त्रास दे. मार दे. पण गांधीजी म्हणायचे ” तू आमची आई असून पण माझ्या भावाला मारण्यासाठी कशी सांगू शकतेस ? मी कधीही माझ्या भावाला मारणार नाही” असे होते शांतीप्रिय गांधीजी.

महात्मा गांधीजीचे शिक्षण :

महात्मा गांधी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर इंग्लंड गेले होते जिथे त्यांनी न्यायशासनाचा अभ्यास केला. नंतर त्यांनी अ‍ॅडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर बॅरिस्टर म्हणून भारतात परतले आणि मग मुंबईत वकील म्हणून काम करू लागले.

महात्मा गांधी ह्यांना त्यांच्या एका भारतीय मित्राने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत बोलावले होते. इथूनच त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिका गेल्यावर त्यांना एक विचित्र प्रकार अनुभवायला मिळाला. त्यांनी बघितले की कशा प्रकारे भारतीयांशी भेदभाव केला जात आहे.

एकदा गांधीजींना स्वतः एका ब्रिटिश गोऱ्या वर्णाच्या माणसाने ट्रेनमधून बाहेर काढले होते कारण गांधीजी त्या ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीतून प्रवास करत होते. त्या काळात फक्त गोरे माणसंच फर्स्ट क्लास मधून प्रवास करणं आपला हक्क समजायचे. गांधीजींनी या घडलेल्या गोष्टीवरून प्रतिज्ञा घेतली की ते काळे आणि भारतीय लोकांसाठी लढतील. त्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या जीवनासाठी सुधार केले त्यासाठी काही चळवळी केल्या. दक्षिण आफ्रिकेमध्ये चळवळीच्या दरम्यान त्यांना सत्य आणि अहिंसा याचे महत्त्व समजले.

महात्मा गांधीजीचा अखेरचा प्रवास :

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात, त्यांनी अनेक संघर्षांच्या आणि आपल्या जीवनाच्या धोक्यांच्या सामन्यात शिकार झाला. अंततः, त्यांच्या अटल्या प्रयत्नांनी भारताला १९४७ मध्ये स्वतंत्रता मिळाली. परंतु दुर्दैवाने, ३० जानेवारी १९४८ रोजी नथूराम गोडसे यांनी महात्मा गांधींच्या संध्याकाळीन प्रार्थनेत बेशब्रीत अगदी रामपंथी गोळ्या मारून त्यांच्या मृत्यूची घटना घडली. गांधींच्या शेवटच्या शब्दांमध्ये “हे राम” शब्द सोडून राहिला, ते खालचंदी एक आवाजावर झालेलं संकेत आहे, ज्याने राष्ट्रपित्ता असलेल्या अजिंक्य नियमांच्या मार्गदर्शन केले होते. त्यांच्या हत्येचं घटनेचं गहन प्रभाव राहिलं, ज्याने स्वतंत्रतेच्या शोधाच्या अंगावरील कठोरता आणि त्याच्या निर्धार्मिकतेच्या त्यागाच्या अंगावर लक्ष घाललं.

Related content

Share With Your Frends

Driven by a passion for writing and a thirst for knowledge, Rutuja Waghmare is embarking on a journey into content creation while actively exploring job opportunities and educational pathways. With a dedication to learning and a keen interest in content creation, she aims to provide valuable insights through engaging articles and blog posts. Eager to connect and grow, Rutuja is committed to sharing information on career development and educational opportunities.

16 thoughts on “Mahatma Gandhi Speech in Marathi |’महात्मा गांधी मराठी भाषण’”

Leave a Reply