जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे ? how to apply caste certificate : आपल्या सर्वांना माहित आहे की भारतात विविध जाती आणि चालीरीतींचे लोक आहेत. यामध्ये काही समुदायांना विशेष अधिकार आणि आर्थिक अधिकार देखील होते परंतु मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती जमातींना यापैकी काहीही नव्हते. त्यामुळे अनुसूचित जाती जमातींसाठी काही हक्क असावेत आणि त्यांनाही पदोन्नती आणि संधीचा समान अधिकार मिळावा, असे सरकारला वाटले .
यामुळे शासनाने अनुसूचित जाती-जमातींना शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालये, शाळा व इतर शिक्षणात निम्मी किंवा कोणतीही फी आकारली जाणार नसल्याचे आश्वासनही दिले. तसेच ज्येष्ठ अनुसूचित जातीच्या नागरिकांना रोजगार क्षेत्रात कालमर्यादेत सूट दिली जाते. पण या सर्वांचा फायदा घेण्यासाठी सरकारला काही ठोस दस्तऐवज/दस्तऐवज/प्रमाणपत्र हवे होते आणि त्यावर उपाय म्हणून सरकारने या जाती जमातीच्या लोकांसाठी जात प्रमाणपत्र/जात प्रमाणपत्र लागू केले.
Contents
जातीचा प्रमाणपत्र कशासाठी लागते ?
आपण ज्या जातीत आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला. क्षण, नोकरी वा अन्य शासकीय आरक्षणातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे ? how to apply caste certificate
महाराष्ट्रात एस.टी., एस.सी., एन.टी., एस.बी.सी., ओ.बी.सी. आणि इतर प्रवर्गासाठी जातीचा दाखला दिला जातो; पण कधी अमुक कागदपत्रे नाहीत म्हणून, तर कधी चुकीच्या ठिकाणी पाठपुरावा केल्यामुळे कित्येक जणांना शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात. अशा हेलपाट्यांपासून सुटका मिलावा म्हणून जातीचा दाखला मोबाइल वर काढा
जातीचा दाखला कसा काढतात? कुठे काढतात?
जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रत्येक गावात आणि शहरात सेतू कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. सर्व सेतू कार्यालये माननीय तहसीलदारांच्या अखत्यारीत येतात. तसेच जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालयात प्रस्ताव सादर करू शकता.
एस.टी.(ST) एस.सी (SC) अथवा एसबीसी व ओबीसी करिता आवश्यक कागदपत्रे
- तलाठी रहिवासी दाखला
- शालासोडल्याचा दाखला जर अर्जदार अशिक्षित असेल तर मुलाचे मुलीचे शाळेचा दाखला.प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा.
- वडील, चुलते, आत्या, आजोबा यांची जात नमूद असलेला शाळा सोडल्याचा दाखला.
- रेशनकार्ड झेरॉक्स.
मात्र महा ई सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे.
कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- उमेदवाराची ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
- पत्त्याचा पुरावा (सातबारा,रेशन कार्ड)
- वयाचा पुरावा (जन्माचा दाखला)
- शाळा सोडल्याचा दाखला
- बोनाफाईड सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा दाखला
- वडिलांचा किंवा आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला
- हक्क पत्र नोंद
- वंशावळ
वरील कागदपत्रे ही कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहेत
जात प्रमाणपत्र कागदपत्रे St जातीसाठी
- उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र
- स्वयंघोषणापत्र
- चौकशी अहवाल
- उमेदवाराची ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
- शाळा सोडल्याचा दाखला व जन्म दाखला
- बोनाफाईल
- वडिलांचा जातीचा दाखला
- वडिलांचा जन्म दाखला पुरावा व शाळा सोडल्याचा दाखला
- आजोबांचा जन्म किंवा मृत्यू दाखला
- आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
- 1950 चा पुरावा
- वंशावळ
- हक्क पत्र नोंद
वरील कागदपत्रे ही अनुसूचित जाती जमाती म्हणजेच ST जातीसाठी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहेत
जात प्रमाणपत्र कागदपत्रे obc
- उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र
- स्वयंघोषणापत्र
- चौकशी अहवाल
- उमेदवाराची ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
- शाळा सोडल्याचा दाखला व जन्म दाखला
- बोनाफाईल
- वडिलांचा जातीचा दाखला
- वडिलांचा जन्म दाखला पुरावा व शाळा सोडल्याचा दाखला
- आजोबांचा जन्म किंवा मृत्यू दाखला
- आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
- 1950 चा पुरावा
- वंशावळ
- हक्क पत्र नोंद
वरील कागदपत्रे ही ओबीसी कास्ट प्रवर्गातील लोकांसाठी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहेत
ऑनलाईन दाखला मिळविण्यासाठी
- https://aaplesarkar.mahao nline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. तेथे नवीन यूजर या पयार्यावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
- नोंदणीनंतर मोबाईल क्रमांकावर आलेला यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग-इन करावे.
- त्यानंतर नवीन पेज उघडेल. डाव्या बाजूला महसूल विभाग हा पर्याय निवडावा. पुढे उप-विभाग हा पर्याय दिसेल. त्यातील महसूल सेवा वर क्लिक करावे.
- हा पर्याय निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल. त्यातील जातीचे प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर आपोआप महाऑनलाईन विभागाचे संकेतस्थळ उघडेल. तेथे ‘जातीचे प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करावे.
- पुढील पेजमध्ये दिसणाऱ्या अर्जात दाखविल्याप्रमाणे माहिती भरावी. सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर एक अर्ज क्रमांक दिला जाईल. पुढे फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर पैसे भरणे हा पर्याय दिसेल. तेथे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरता येतात. पैसे भरल्यानंतरच अर्ज पडताळणीसाठी पाठविला जातो.
जातीचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागतो म्हणजेच अर्ज भरावा लागतो. त्या अर्जाचा नमुना मराठी मध्ये तुम्हाला खाली देण्यात आला आहे
जातीचा दाखला / Caste Certificate फॉर्म
Download
आपल्याला सरकारी नोकर्याच्या संदर्भात आणखी माहिती आवश्यक आहे तर, कृपया नौकरीची अधिसूचना पहा, त्याची माहिती आपल्या मित्रांसोबत सामायिक करा आणि त्यांना सरकारी नोकर्याच्या संधी मिळवण्यात मदतीची करा. इतर सरकारी नोकर्यांसाठी मराठीतील फुलेरडी नोकर्यांसाठी दिनचर्या naukaricenter.com ला भेट द्या.”
हे पण वाचा :
जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे ? how to apply caste certificate
13 thoughts on “जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे ? how to apply caste certificate 2024”