Mahila Bachat Gat Loan;’महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र 2024′

Mahila Bachat Gat Loan : नमस्कार मित्रांनो,आज आपण ह्या लेखात mahila bachat gat loan yojana  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वतःचा एखादा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा त्यांच्या सुरु असलेल्या एखाद्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी कमी व्याजदरात बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण  वाचा.

महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी राबविण्यात येत आहे. ही योजना महिलांना बचत आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत करते.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील सुशिक्षित महिलांना त्यांचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे जेणेकरून महिला स्वतःचा लघु उद्योग सुरु करून राज्याचा आर्थिक विकास करू शकतील. [बचत गट शासकीय योजना(Mahila Bachat Gat Loan)]

Mahila Bachat Gat Loan काय आहे ही योजना :

ही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे जी महिलांना स्वयंरोजगार आणि लघु उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेअंतर्गत, महिला बचत गटांना ₹5 लाख ते ₹20 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कर्जाचा व्याज दर 4% प्रतिवर्ष आहे आणि परतफेड कालावधी 3 वर्षे आहे.

राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे प्रमाण कमी आहे त्यामुळे अशा कुटुंबाकडे उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी कायमस्वरूपी साधन उपलब्ध नसल्या कारणामुळे अशा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते शहरी भागात रोजगार उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागातील महिलांच्या खांद्यावर कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी असते त्यामुळे त्यांना रोजगारासाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाणे शक्य नसते त्यामुळे ग्रामीण भागातील महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु उद्योग सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते व अशा आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाकडे उद्योग सुरु करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Mahila Bachat Gat Loan योजनेचे उद्दिष्टे :

  • राज्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा बचत गटातील महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे हा महिला बचत गट शासकीय योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करणे.
  • बचत गटातील ज्या महिलांना स्वतःच्या उद्योगाचा विस्तार करायचा आहे अशा महिलांना योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे.
  • महिलांनी सुरु केलेल्या उद्योगाला चालना देणे.
  • महिला आर्थिक दृष्ट्या बळकट व्हाव्यात.
  • राज्यात महिला उद्योजकांची संख्या वाढविणे.

mahila bachat gat कर्ज योजनेचे फायदे :

  • हिला बचत गटांना लघु उद्योग आणि स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळते.
  • कर्जावर सवलत व्याज दर आकारला जातो.
  • कर्ज परतफेड करण्यासाठी पुरेशी मुदत दिली जाते.
  • महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होते.
  •  गरिबी कमी करण्यास मदत होते.
  • महिलांसाठी स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या संधी निर्माण होते.
  • महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
  • महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत होते.
  • महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आर्थिक आणि सामाजिक संधींमध्ये समान प्रवेश प्रदान करते.
  • महिलांच्या सक्षमीकरणाद्वारे समाजाचा विकास होतो.
  • महिलांना त्यांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा बाजारपेठेत प्रसार करण्यासाठी मदत केली जाते.
  • महिलांमध्ये उद्योजकीय भावना निर्माण करणे आणि त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

mahila bachat gat yojana कर्जाची रक्कम :

  • महिला बचत गटाला किमान ₹1 लाख आणि जास्तीत जास्त ₹20 लाख कर्ज मिळू शकते.

mahila bachat gat yojana व्याज दर ( Bachat gat loan interest rate ) :

  • महिला बचत गटांसाठी कर्जाचा व्याज दर 4% आहे.

mahila bachat gat yojana कर्जाची परतफेड :

  • कर्जाची परतफेड 3 वर्षांच्या कालावधीत करावी लागते.

mahila bachat gat yojana कर्जाचा उपयोग :

  • कर्जाचा उपयोग स्वयंरोजगारासाठी आणि लघु उद्योगांसाठी केला जाऊ शकतो.
  • कर्जाचा उपयोग खालील कामांसाठी केला जाऊ शकतो:
  • मशीनरी आणि उपकरणे खरेदी
  • कच्चा माल खरेदी
  • व्यवसायासाठी जागा भाड्याने घेणे
  • कर्मचाऱ्यांची नियुक्ती
  • प्रशिक्षण आणि शिक्षण
  • मार्केटिंग आणि जाहिरात

महिला बचत गटाचे फायदे :

  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल.
  • महिला बचत गट कर्ज योजना 2024 अंतर्गत राज्यातील महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील व राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध होतील त्यामुळे बेरोजगार महिलांना व नागरिकांना रोजगारासाठी स्वतःच्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही व नागरिकांचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारे स्थलांतर थांबेल.
  • योजनेअंतर्गत महिला राज्यात नवीन उद्योग सुरु करू शकतील त्यामुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व राज्यातील बेरोजगार कमी होईल.
  • या योजनेअंतर्गत राज्यात नवीन उद्योग सुरु होऊन राज्याचा औद्योगिक विकास होईल.
  • राज्यातील महिला स्वावलंबी बनतील. [बचत गट शासकीय योजना]
  • स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढेल.
  • स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक महिलांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता सुद्धा भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचा सामाजिक स्तर उंचावेल.
  • राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • राज्यातील महिलांचे जीवनमान उंचावेल
  • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या कुटुंबांचा सांभाळ करू शकतील.
  • महिला बचत गट कर्ज योजनेच्या सहाय्याने महिला उद्योजकांस प्रोत्साहन मिळेल. [बचत गट शासकीय योजना]

Mahila Bachat Gat Loan Information In Marathi अंतर्गत आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • जन्म प्रमाण पत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँकेचा तपशील
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक
  • शपथ पत्र

Mahila Bachat Gat Loan योजना अर्ज प्रक्रिया :

  • या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी कर्ज मागणी अर्ज आणि इतर सर्व कागदपत्रांसह कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करून सादर करणे आवश्यक आहे.
  • mahila bachat gat Loan योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, महिलेने प्रथम तिच्या जवळच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला भेट दिली पाहिजे.
  • अर्जावरील सर्व फील्ड पूर्ण करा, आवश्यक फाइल्स संलग्न करा आणि फॉर्म सबमिट करा.
  • अर्ज सादर केल्याची पोच देणे आवश्यक आहे.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [बचत गट शासकीय योजना]

महिला बचत गट नोंदणी अर्ज : Click Here

हे पण वाचा :

Share With Your Frends

Driven by a passion for writing and a thirst for knowledge, Rutuja Waghmare is embarking on a journey into content creation while actively exploring job opportunities and educational pathways. With a dedication to learning and a keen interest in content creation, she aims to provide valuable insights through engaging articles and blog posts. Eager to connect and grow, Rutuja is committed to sharing information on career development and educational opportunities.

Leave a Reply