IPS Full Form in Marathi : नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत IPS Full Form in Marathi iPS म्हणजे काय संपूर्ण माहिती civil सर्विस ची आवड असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याना आयपीएस बद्दल माहिती आहे . IPS हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा लगेच आपल्या डोळ्यासमोर एखादा पोलीस ऑफिसर दिसतो.परंतु आपल्याला आयपीएस (IPS ) चा फुल फॉर्म माहिती आहे का? किंवा आयपीएस कसे बनता येते याची माहिती जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न कधी केला आहे का?
आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला IPS चा फुल फॉर्म सांगणार आहोत. त्याचबरोबर IPS म्हणजे काय? आयपीएस कसे होता येते? आयपीएस चे मासिक वेतन आणि सुविधा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Contents
IPS म्हणजे काय? (What Is IPS In Marathi)
लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही IPS वर असते. IPS हा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा पोलीस अधिकारी असतो.आयपीएस हे एक उच्च प्रतिष्ठा प्राप्त असलेले सरकारी पद आहे. आयपीएस अधिकारी हा आपल्या प्रदेशात शांतता अणि सुव्यवस्था स्थापित करत असतो, सर्व गुन्ह्यांची चौकशी करत असतो. त्यावर देखरेख ठेवत असतो.
आपल्या प्रदेशामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसवणे हे आयपीएस चे काम असते. जसे की चोरी, खून, दंगल, इत्यादी गोष्टी होऊ नयेत यासाठी आयपीएस अधिकारी कार्य करत असतो.
IPS चा फुल फॉर्म काय आहे | IPS full form in Marathi
IPS चे पूर्ण रूप “Indian Police Service” ज्याचा मराठीत अर्थ “भारतीय पोलिस सेवा” आहे.IPS हे एक भारतीय सरकार तर्फे दिले जाणारे पोलीस ऑफिसरचे एक उच्च पद आहे. आयपीएस अधिकारी हा त्याला दिलेल्या प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत असतो. लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही IPS वर असते. IPS हा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा पोलीस अधिकारी असतो.
IPS full form in English | Indian Police Service |
IPS full form in Marathi | भारतीय पोलिस सेवा |
स्थापनेची तारीख | 1905 (इम्पीरियल पोलिस म्हणून) 1948 (IPS म्हणून) |
जबाबदारी | कायदा सुव्यवस्था ठेवणे, राज्यात किंवा देशात शांतता आणि गुन्हे न होऊ देणे. |
Duties | Law Enforcement, Crime Investigation, Security Intelligence -(Internal & External), Counter-Terrorism, Public Order, VIP Protection, Disaster Relief |
Selection | Civil Services Examination |
Official website | https://ips.gov.in/ |
IPS होण्यासाठी काय पात्रता आहे?
- आयपीएस होण्यासाठी तुम्हाला UPSC नागरी सेवा परीक्षा पास व्हावी लागते.
- यासाठी तुमचे आयुर्मान कमीत कमी 21 वर्षे असणे गरजेचे आहे.
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी मिळवणे आवश्यक आहे.
- उमेदवार भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
- जनरल कॅटेगिरी साठी 32 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
- तर SC /ST साठी कमाल वयोमर्यादा ही 37 वर्षे आहे तर ओबीसी साठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे.
- IPS ही पोलीस खात्यातील पोस्ट असल्याने यामध्ये तुमची शारीरिक तंदुरुस्ती तपासली जाते. शारीरिक तंदुरुस्ती कशी असावी याविषयी नियम खालीलप्रमाणे
○ पुरुष –
■ उंची- 165 सेमी
■ छाती- 84
■ नजर- 6 किंवा 6
○ महिला –
■ उंची – 150 सेमी
■ छाती- 79
■ नजर- 12 किंवा 9
FAQ’s
आयपीएस चा पगार किती असतो?
आयपीएस ची सॅलरी ही त्याच्या पदावर अवलंबून असते. भारतात सातव्या वेतन आयोगानुसार IPS चे वेतन दरमहा 56,100 ते 225,000 एवढे आहे. याव्यतिरिक्त आयपीएसला बऱ्याच प्रकारचे भत्ते दिले जातात. वेळेनुसार आणि प्रमोशन नुसार आयपीएस चा पगार हा वाढत जातो.
IPS कोणती परीक्षा द्यावी लागते व परीक्षा कितीदा देता येते?
आयपीएस अधिकारी होण्यासाठी तीन टप्प्यांत कठीण परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. या परीक्षेची जबाबदारी यूपीएससीकडे देण्यात आली आहे. UPSC म्हणजे संघ लोकसेवा आयोग. भारतीय पोलिसांमध्ये आयपीएस अधिकारी हे पद हे उच्च आणि जबाबदार पद आहे, त्यामुळे या पदावर आशादायी, शिक्षित, सक्षम आणि जबाबदार व्यक्तीला नोकरी देणे बंधनकारक आहे.UPSC ही IAS, IPS, IFS इत्यादी भारतातील सर्वात मोठ्या नागरी सेवांच्या परीक्षा आयोजित करणारी संस्था आहे. upsc ची परीक्षा ही सर्वोच्च परीक्षांपैकी एक आहे, त्यामुळे ती उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करावे लागतात. पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी फार कमी आहेत.
IPS हि परीक्षा OBC कॅटॅगरी साठी ९ वेळा देता येते, General Category साठी वयाच्या 6 वेळा देता येते आणि SC/ST उमेदवारांना वयाच्या 37 वर्षेपर्यंत आणि कितीही वेळा हि परीक्षा देता येते.
आयपीएस अधिकारी चे कार्य काय असते?
सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी प्रतिबंध, तपास आणि शोध, व्हीआयपी सुरक्षा, दहशतवादविरोधी, तस्करी, रेल्वे पोलिसिंग, अंमली पदार्थांची तस्करी, आपत्ती व्यवस्थापन, सीमा पोलिसिंग, आर्थिक कायद्यांचे संरक्षण इ.
4 thoughts on “IPS Full Form in Marathi | IPS म्हणजे काय संपूर्ण माहिती ?”