२००+मराठी म्हणी व त्यांचे अर्थ :
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग हा घटक अनेक स्पर्धा परीक्षेच्या मानाने महत्वाचा मानला जातो.
चला तर बघूयात काही महत्त्वाच्या म्हणी व त्यांचे अर्थ
• कणगीत दाना भिल्ल उताणा – गरजेपुरते आहे म्हंटल्यावर उद्याची काळजी न करणे.
• अळी चमळी गुप चचळी – आपले रहस्य गुचपत ठेवण्यासाठी दुसऱ्याला चुप करणे.
• आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वतःचाच फायदा साधून घेणे
• आकारे रंगती चेष्टा – बाह्य लक्षणांवरून अंतगथत वागणुकीचे चचत्र स्पष्ट होते.
• आपली पाठ आपणास ददसत नाही – स्वतःचे दोष स्वतः ला दिसत नाही.
• अर्ीदान महापुण्य – दान नेहमी सत्पात्री करावे.
• आगीतून उठून फुफाट्यात पडणे – एका संकटातून निघून दुसऱ्या संकटात सापडणे.
• आलिया भोगासी असावे सादर – तक्रार न करता आलेली परिस्थिति स्वीकारणे.
• आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – मुळातच आळशी वयक्तीस अजून अनुकूल परिस्थिति निर्माण करणे.
• उचलली जीभ लावली टाळूला – विचार न करता बोलणे
• आधीच तारे त्यात शिरले वारे – आधीच मकथट आचण. त्यात त्यानेमद्यपान करणे.
• मनी नाही भाव देवा मला पाव – कर्म न करता फळ मागणे.
• देव देवळात चीत खेटरात – एका कामास जाणे पण मन दुसरीकडे असणे.
• कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी – सवाांचेच दिवस येतात समान परिस्थिति कधीच राहत नाही
• कुठे जाशी भोगा तो तर तुझ्यापुढे उभा – नको असलेली संकट समोर येणे.
• कावळा बसायशी आचण फांदी तुटायशी – परस्पर संबंध नसतांना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे
• आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला – दुसऱ्याला आपण ज्या दोषाबद्दल हसतो तोच दोष नेमका आपल्याजवळ असणे.
• आजा मेला नातू झाला – एखादे नुकसान झाले असता तयाच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट होणे.
[२००+मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : Marathi Mhani in Marathi २०२४]
• आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन – अपेक्षा केली तयाच पेक्षा जास्त चमळणे
• असतील चशते तर जमतील भुते – पैस्यामुळेच चार व्यक्ती आपल्या भोवती असतात.
• काप गेले पण भोके राचहली – वैभव गेले पण खणा मात्र राचहल्या
• करीन ती पूवथ – मी करीन तेच योग्य असे वागणे.
• अचाट खाणे मसनात जाणे – खाण्याचपण्यात अचतरेक घातक ठरतो.
• अग अग म्हशी मला कोठे नेशी – आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारणे.
• अन्नसत्री जेवून चमरपूड मागणे – अगोदरच एखादे काम फुकट करून वर चमजास खोरी करणे.
• अडली गाय फटके खाय – अडचणीत सापडनाऱ्याला आणखीच हैराण करणे.
• आपला हात जगन्नार् – आपली उन्नती आपल्या कातुथत्वावरच अवलंबून असते.
• करंगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल काय – मुळातच लहान वस्तू कितीही प्रयत्न केले तरी मर्यादेपेक्षा वाढत नाही.
• दुरून डोंगर साजरे – कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते पण जवळूनच तचे खरे स्वरूप कळते.
• उडत्या पाखराची पिसे मोजणे – अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
• एका माळेचे मणी – सगळेच सारखे
• उठता लाथ बसता बुक्की – एकसारखा नेहमी मार देणे.
• एकाची जळते दांडी दुसरा त्यावर पेटवू पाहतो चवडी – दुसऱ्याचा अडचणीतही स्वतःचा फायदा पाहणे
• कोळसा जीतका उगाळावा चततका काळाच – वाईट गोष्टीचा कितीही उहापोह केला तरी ती वाईटच
• कोरडया बरोबर ओले जळते – अपराध न करणाऱ्याची अपराध्यासोबत गणना करणे.
• खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे – बोलताना एक बोलायचे आणि प्रत्यक्ष कृती वेगळीच करायची
• खोट्याच्या कपाळी गोटा – खोट्यापणाने वाईट काम करणाऱ्या माणसाचे शेवटी नुकसान होते.
• कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच – मुर्खाला कितीही समजावले तरी व्यर्थच.
• काकडीची चोरी फाशीची चशक्षा – अपराध लहान पण शिक्षा मोठी.
• गरज सरो वैद्य मरो – आपले काम झाले की उपकारकत्याथची पवाथ न करणे.
• काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही – खरी मैत्री दकरकोळ कारणाने भंग होत नाही.
• भरवशाच्या म्हशीला टोणगा – ज्याची खात्री वाटली त्यानेच नीराशा होऊन बसणे
• भोक नको पण कुत्रा आवर – एखाद्यावर उपकार करता नाही आले तरी चालेल पण त्याच्या कायाथत अडर्ळा आणू नये [२००+मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : Marathi Mhani in Marathi २०२४]
• मन राजा मन प्रजा – हुकूम करणारेही आपलेच मन व ते तोडणारेही आपलेच मन
• मस्करीची होते तुस्करी – र्ट्टेचा परिणाम अनेकदा भयंकर वाईट होतो
• मरावे परी कर्तव्यरूपी उरावे – आपण जगात नसलो तरी कीर्ति राहील तसे काम करावे
• ऐकावे जनाचे करावे मनाचे – सर्वांचाच वचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे.
• दाम करी काम – पैशाने सवथ कामे साध्य होतात
• चढेल तो पडेल – उत्कषाथसाठी धडपडनाऱ्याला अपयश आले तर त्यात कमीपणा येत नाही.
• कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात – क्षुद्र माणसाच्या नींदेने चांगल्या माणसाचे काही नुकसान होत नाही.
• खान तशी माती – आई बाबा प्रमाणे मुले.
• कसायाला गाय धाजीणी – भांडखोर व अनीच गुंडांपुढे गरीब माणसे नमतात.
• एक हाताने टाळी वाजत नाही – भांडणाचा दोष एक पक्षाकडेच असत नाही.
• कसायाला गाय धाजीणी – भांडखोर व अनीचतमान गुंडांपुढे गरीब माणसे नमतात.
• इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी अडचणीत.
• कामापुरता मामा – गरजेपुरते गोड बोलणे.
• खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी – चवलासी जीवनाचीच चनवड करणे.
• नाव मोठे लक्षण खोटे – दीखावा मोठा, प्रत्यक्षात उलट परिस्थिती .
• हाताच्या काकणाला आरसा कशाला – प्रत्यक्ष स्पष्ट असणाऱ्या गोष्टीस पुरावा नको असतो.
• गोगलगाय आण पोटात पाय – एखाद्याचे खरे वागणे न दीसणे.
• खायला काळ अन धरणीला भार – निरुद्योगी माणूस सवाांनाच जड होतो
• झाकली मुठ सव्वालाखाची – मौज पाठवून स्वतःची लाज रखने.
• घर ना दार देवळी चबऱ्हाड – बायको पोरे नसणारा एकटा मनुष्य.
• घोडे मैदानाजवळ आहे – निकालाची वेळ जवळच आली आहे.
• माकडाच्या हातात कोलीत – वध्वंसतोशी माणसाच्या हातात कारभार सोपचवणे.
• गाड्याबरोबर नळ्याची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचा देखील फायदा होतो.
• खाऊन माजावे टाकून माजू नये – पैशाचा , संपत्तीचा गैरवापर करू नये.
• खाणे जाणे तो पचवू जाणे – एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास समर्थ असणे.
• गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता – मुर्खाला कितीही उपदेश केला तरी तो व्यर्थच ठरतो
• कुंभारणीच्या घरातला कडा कुंभारणीचा – आपल्या ताब्यातील वस्तूवर आपलाच हक्क दाखचवणे.
• काट्याचा नायटा करणे – राईचा पवथत करणे.
• खऱ्याला मरण नाही – खरे कधी लपत नाही.
• गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी – एखाद्या गोष्टीची अनुकुलता असुन चालत नाही तर सोबतच त्याचा फायदा क्षमता असावी.[२००+मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : Marathi Mhani in Marathi २०२४]
• गाढवास गुळाची चव काय – ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्याचे महत्व निरर्थक असते.
• पाचामुखी परमेश्वर – पुष्कळ लोक बोलतात ते खरे
• सुतासाठी मणी फोडणे अयोग्यच – क्षुल्लक गोष्टीसाठी मौल्यवान वस्तुचा नाश करणे चूक आहे.
• दाखवले सोने हसे मुल तान्हे – मौल्यवान वस्तूचे सवाांना आकषथण असते.
• कोळीला नारणी अनघर चंद्रमौळी – अत्यंत दाररद्रयाची अवस्ता येणे.
• हा सूयथ हा जटाद्रर् – प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट चसद्ध करणे.
• आवळा देऊन कोहळा काढणे – शुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
• सुंठीवाचून खोकला गेला – उपचाराचशवाय आजार गेला.
• शेळी जाते जीवचनशी खाणारा म्हणतो आतड – एखाद्याने आपल्यासाठी केलेल्या श्रमाची त्यागाची दकमत न करता त याच तील उचणवा काढणे.
• भुकेला कोंडा चनजेला धोंडा – अगदी साधेपणाने राहणे.
• चचंता परा ते येई घरा – दुसऱ्याचे वाईट चचंतले की ते आपल्यावरच उलटते.
• ताकास तूर लागू न देणे – कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता लागू न देणे.
• प्रयत्नांती परमेश्वर – प्रयत्नाने कठीण गोष्टही साध्य होते.
• पुढे चतखट मागे पोचट – ददसायला मोठेपण प्रत्यक्षात नसणारे.
• चोर सोडून संन्यासाला सुळी देणे – अपराधी सोडून दुसऱ्यालाच शिक्षा करणे.
• मेलेल्या म्हशीला मणभर दुध – एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे.
• हात ओला तर चमत्र भला – फायदा असेपयांत सारे भोवती गोळा होतात.
• कडी चोर तो माडी चोर – शुल्लक अपराधाचा घडलेल्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.
• काळ आला होता पण वेळ आली नव्हती – नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात बचावणे
• उंदराला मांजर साक्षी – सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे.
• काडीची सत्ता आचण लाखाची मत्ता बरोबर होत नाही – संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते.
• एक ना धड भाराभर चचंध्या – सगळेच निरुपयोगी
• एका म्यानात दोन तलवारी राहत नाही – दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोचवंदाने नांदू शकत नाही
• उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये – कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये
• आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? – जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थच
• गरजवंताला अक्कल नसते – गरजेपोटी दुसऱ्याचे निमुटपणे सहन करणे.
• गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य – अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते.
- बाजारात तुरी भट भटणीला भारी – उगाचच कल्पनेचा आधार घेऊन भांडण करणे.
- चभत्या पाठी ब्रह्मराक्षस – ज्या गोष्टीस आपण भितो तीच गोष्ट पुढे येऊन उभे राहणे
- बाप दाखव नाही तर श्राद्ध कर – अपराध केला नाहीतर तसे चसद्ध करा ककंवा अपराध काबुल करा.
- लेकी बोले, सुने लागे – एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे.[२००+मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : Marathi Mhani in Marathi २०२४]
हे पण वाचा :
- IPS Full Form in Marathi | IPS म्हणजे काय संपूर्ण माहिती ?
- Happy Birthday Wishes For Friend In Marathi | 2024 मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
- Mahatma Phule Jan Arogya yojana in marathi |महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी 2024
- Dr Babasaheb Ambedkar Bhashan in Marathi 2024
- The Most Accurate Actual size of Online Ruler
2 thoughts on “२००+मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : Marathi Mhani in Marathi २०२४”