छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आज आपण या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भाषण मराठीमध्ये बघणार आहोत आपण पाहणार आहोत शिवजयंतीसाठी अतिशय सुंदर मराठी भाषण
Contents
छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण
भाषण सुरू करण्यात अगोदर सर्वप्रथम भाषणामध्ये या महत्त्वाच्या ओळी असाव्यात जेणेकरून भाषणाची सुरुवात चांगली होते .
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो
छत्रपती शिवाजी राजा
असा एकच होऊ न गेला ….
इतिहासाच्या पानांमध्ये
नाव आपले कोरून गेला …….
सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सर्वांना माझा नमस्कार माझे नाव Ajit आहे
आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करिता होत
प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज हे शूर पराक्रमी आणि महान राजा होते
त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला
त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान औरंगजेब शाहिस्तेखानाचा शाहिस्तेखान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली
त्यांनी रयतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या
तीन एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले
त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण | Shivaji Maharaj Marathi Bhashan
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिशय सुंदर असं भाषण बघणार आहोत तुम्हालाही ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरु करूया
“आले किती गेले किती ?
उडून गेले भरारा…….
आले किती गेले किती ?
उडून गेले भरारा…….
संपला नाही आणि संपणार नाही,
माझ्या शिवबाचा दरारा.
संपला नाही आणि संपणार नाही,
माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा.”
सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू , स्वराज्य संस्थापक , रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो
सह्याद्रीच्या कड्या कपाड्यांनाही पाझर फुटेल,
डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल,
झाडे झुडपे ही शहरातिल आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा ,ज्याला कितीही विशेषण लावली तरी ती कमीच पडतील असा आदर्म्हश राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
“शब्दही पडती अपुरे,
अशी शिवरायांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.”
19 फेब्रुवारी १६३० या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले साऱ्या आसमंतात आनंदाची उधालन झाली या थोर दिनी मासाहेब जीजाउंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला
“सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकलाला,
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला.
घेऊनी तलवार शत्रू वर गरजला,
महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला.”
बाळ राजाना त्यांचे पिताजी शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही तरीही मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले
बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अड़थले आले पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून एक किंचितही बाजूला सरले नाही.
तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशिद, हिरोजी फर्जंद, नेताजी पालकर, आदि जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण , गड आला पण सिंह गेला . प्रतापगडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका व शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य पराक्रम आणि मुत्सद्देगिरी ची महती पटवून देतात.
शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व होते त्यांनी प्रजेवर अन्याय आत्या बंदोबस्त केला आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेत.
सिंहाची चाल गरुडाची नजर
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
हीच छत्रपती शिवरायांची शिकवण
अशा या महान लोककल्यान्कारी राजाचा मृत्यु दिनांक ६ एप्रिल १६८० रोजी रायगडावर झाला आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचे कार्य,साहस जनतेविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात
शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन
इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर अन विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे ……
राजा शिवछत्रपती !
अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो
जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद
या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
6 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण |अतिशय सुंदर आणि जबरदस्त मराठी भाषण”