गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये गुरु पौर्णिमा निमित्त अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आहोत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान हे खूप मोठे असते जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये योग्य तो मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे आणि एक चांगले जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु आज आपण या लेखामध्ये गुरुपौर्णिमा निमित्त भाषण मराठीमध्ये बघणार आहोत
Contents
गुरु पौर्णिमा म्हणजे काय ?
गुरु पौर्णिमा या दिवशी शिक्षक आणि आपल्या गुरुबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि याच दिवशी विद्यार्थी शिक्षकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात आणि या कार्यक्रमामांना काही विद्यार्थी आपल्या आवडत्या गुरु बद्दल भाषण तयार करतात आणि ते सर्वांसमोर सादर करतात .
गुरु पौर्णिमा हा केवळ भारत नेपाळ आणि इतर देशांमध्ये हिंदू बौद्ध आणि जैन यांच्याद्वारे सादर केला जाणारा एक वार्षिक उत्सव आहे हिंदू कॅलेंडरच्या अनुसार आषाढ जून जुलै या हिंदू महिन्यात दिवस साजरा केला जातो .
गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi
भाषण सुरू करण्यात अगोदर सर्वप्रथम भाषणामध्ये या महत्त्वाच्या ओळी असाव्यात जेणेकरून भाषणाची सुरुवात चांगली होते .
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वप्रथम सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
माझे नाव ………… आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त सर्वजण एकत्र जमलेलो आहोत
आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे
भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराच्या स्थान दिलेले आहे
कारण गुरु आपल्याला अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय
आई-वडील पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूंचाच प्रभाव असतो गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात या जीवनात मला अभिमानाने जगायला शिकवलं अन्यायाविरुद्ध लढाईला शिकवलं
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे ऋणी राहील शेवटी एकच म्हणू इच्छिते/इच्छितो की
गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे
मूल आयुष्याचे जाणून घ्यावे …….
गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे
चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे ……..
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
धन्यवाद!
गुरु पौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर अशी मराठी कविता
गुरु शिष्याचे जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते
गुरु शिष्याचे झुकून नमन करतात सारे
जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे
झुकून नमन करतात सारे
सजीव निर्जीवांकडून मिळालेली प्रेरणा ही गुरुच असते
मनामध्ये उठलेला आशीचा ध्यास
आन नवनिर्मितीची आसही गुरुच असते
काय कीर्ती वर्णवी गुरूंच्या अगम्य महतीची
कठीण प्रसंगी ही आठवण होते फक्त त्यांच्याच सोबतीची
दिशादर्शक बाल असतो गुरु संस्काराची खान असतो
गुरु प्रगतीचे पंख असतो गुरु कर्तुत्वाच्या रणांगणावरील शंख नाद असतो
ध्यास किर्तीचा गुरु असतो श्वासपूर्तीचा गुरु असतो
मार्ग यशाचा गुरु असतो किरण असेचा गुरु असतो
गुरुपौर्णिमेनिमित्त फक्त दहा ओळींचे सोपे व सुंदर भाषण
सर्वांना नमस्कार
गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे मायबाप
गुरु शरणी जाता
हरतील सारे व्याप
हरतील सारे व्याप
माझे नाव Neha आहे आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते
आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात
कारण या दिवशी आधी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता
आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे
आई-वडिलांनंतर आपले पहिले गुरु शिक्षक असतात जे भावी पिढी उत्तम घडवण्याचे कार्य करतात
गुरुना वयाचे रूपाचं जाती धर्माचं बंधन नसतं गुरु आपले खरे मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असतात
गुरूंचे महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे
शेवटी मला म्हणावेसे वाटते की
गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र
गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi 2023 लेखात आपण गुरुपौर्णिमा निमित्त भाषण मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
Related Content :
Nahi