पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन | PM Vishwakarma Yojana Online Apply 2024

PM Vishwakarma Yojana Online Apply पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन : भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ सुरू करण्यात आली आहे. ही योजना कारागीरांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल.

या लेखात आम्ही तुम्हाला विश्वकर्मा योजना २०२४ साठी ऑनलाइन अर्ज कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत.देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्त-कलाकार आणि कारागिरांना सहाय्य देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

कौशल्य प्रशिक्षण
या योजनेत 18 पारंपरिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. या 18 ट्रेडमध्ये लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तुम्हाला दररोज 500 रुपये स्टायपेंड देखील मिळेल. याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, 15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देखील दिले जाईल.

पीएम विश्वकर्मा योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • ओळखपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर

पीएम विश्वकर्मा योजना अर्ज कसा करायचा

1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
2. येथे Apply Online लिंकवर क्लिक करा.
3. पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करा.
4. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे येईल.
5. यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे भरा.
6. भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा. यानंतर सबमिट बटण दाबा

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता

1. भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2. योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 18 व्यापारांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असणे आवश्यक
3. वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
4. मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.
5. योजनेत समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी कोणत्याही एका जातीचा असावा.

पीएम विश्वकर्मा योजना पारंपरिक उद्योगांचा समावेश

  • सुतार
  • होडी बांधणी कारागीर
  • चिलखत बनवणारे
  • लोहार
  • हातोडी आणि अवजार संच बनवणारे
  • कुलूप बनवणारे
  • सोनार
  • कुंभार
  • शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे)
  • चर्मकार (पादत्राणे कारागीर)
  • मेस्त्री
  • टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर
  • बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे
  • न्हावी (केश कर्तनकार)
  • फुलांचे हार बनवणारे कारागीर
  • परीट (धोबी)
  • शिंपी आणि
  • मासेमारचे जाळे विणणारे.

PM विश्वकर्मा योजनेचे व्याजदर –

या योजनेंतर्गत लोकांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज दिले जाईल. यासाठी ५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात लोकांना १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येईल.

वार्षिक व्याजदर – ५ %
कर्जाची रक्कम – ३ लाख रुपयांपर्यंत
कर्जाची मुदत – ४ वर्षांपर्यंत

पीएम विश्वकर्मा योजना: कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी

या योजने अंतर्गत अर्ज करणारे लोक एकूण ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. पहिल्यांदा आपल्याला १ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते ज्याचा परतफेडीचा कालावधी १८ महिन्यांचा आहे.

कर्जाचे टप्पे        कर्जाची रक्कम      परतफेड कालावधी

पहिला टप्पा       १ लाख                   १८ महिन्यांपर्यंत

दुसरा टप्पा        २ लाख                   ३० महिन्यांपर्यंत

पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे

  1. पीएम विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेचा मुख्य उद्देश कारागिरांना कौशल्य आणि आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे.
  2. यामध्ये अर्जदारांना तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात असलेल्या लघू व मध्यम उद्योग विभागात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
  3. योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.
  4. या योजनेंतर्गत अर्जदारांना ५०० रुपये प्रतिदिन भत्ता देण्याची तरतूद आहे. तसेच ५ दिवस कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  5. टूलकिट प्रोत्साहन म्हणून १५,००० रुपये अनुदान देण्याची सुविधा आहे.

PM विश्वकर्मा योजनेचे व्याजदर –

या योजनेंतर्गत लोकांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज दिले जाईल. यासाठी ५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात लोकांना १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येईल.

वार्षिक व्याजदर – ५ %
कर्जाची रक्कम – ३ लाख रुपयांपर्यंत
कर्जाची मुदत – ४ वर्षांपर्यंत

पीएम विश्वकर्मा योजना: कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी

या योजने अंतर्गत अर्ज करणारे लोक एकूण ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. पहिल्यांदा आपल्याला १ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते ज्याचा परतफेडीचा कालावधी १८ महिन्यांचा आहे.

कर्जाचे टप्पे        कर्जाची रक्कम      परतफेड कालावधी

पहिला टप्पा       १ लाख                   १८ महिन्यांपर्यंत

दुसरा टप्पा        २ लाख                   ३० महिन्यांपर्यंत

या योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेसंबंधी असं म्हटलं जातंय की, गुरु-शिष्य परंपरेला चालना देणे आणि कारागिरांच्या कौटुंबिक-आधारित पारंपारिक व्यवसायाला बळ मिळेल हा यामागचा उद्देश आहे.

शिवाय कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे. तसेच या कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक विक्री साखळीशी जोडणे ही या योजनेची इतर उद्दिष्टे आहेत.

तीन लाखांचे कर्ज मिळेल

जर व्यक्तीकडे पारंपारिक कौशल्य असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. हे कर्ज फक्त 5 टक्के व्याजदराने मिळेल.

More Content

Share With Your Frends

Driven by a passion for writing and a thirst for knowledge, Rutuja Waghmare is embarking on a journey into content creation while actively exploring job opportunities and educational pathways. With a dedication to learning and a keen interest in content creation, she aims to provide valuable insights through engaging articles and blog posts. Eager to connect and grow, Rutuja is committed to sharing information on career development and educational opportunities.

9 thoughts on “पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन | PM Vishwakarma Yojana Online Apply 2024”

Leave a Reply