Solar Panel Yojana Maharashtra ;’Rooftop Solar Yojana Marashtra 2024′;’Rooftop Solar Yojana Marashtra 2024′:- नमस्कार , सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सोलर रूफ टॉप सबसिडी योजना सुरू केली आहे. आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे.या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र राबविण्याचा विचार केला.
आज आपण आपल्या केंद्र सरकारद्वारे राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घरावर सोलर रुफटॉप बसविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र आहे.या योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार आहे
त्यासाठी शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल तर सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला थोडीफार आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान 1 किलोवॅट क्षमतेची छतावर (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून टप्पा 2 अंतर्गत वित्त सहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.
Contents
सोलर पॅनल योजना महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया (Solar Panel Yojana Maharashtra online registration )
तुम्हालाही तुमच्या घरी सोलर पॅनल लावून सौरऊर्जेचा वापर करायचा असेल आणि त्यासाठी सबसिडी मिळवायची असेल, तर तुम्ही मोफत सोलर रुफटॉप योजनेंतर्गत नोंदणी करून घेऊ शकता.
केंद्र सरकारने आणलेल्या अनेक योजना या दिशेने काम करत आहेत, ज्या अंतर्गत लोकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी चांगल्या अनुदानाचा लाभ मिळत आहे. तुम्ही अधिकृत पोर्टलला भेट देऊन या योजनेंतर्गत मोफत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानासाठी अर्ज करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही मोफत सौर रूफटॉप योजनेचा लाभ घेऊ शकता.
योजनेचे नाव | सोलर पॅनल योजना महाराष्ट्र |
लाभार्थी | घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था, निवासी कल्याणकारी संघटना, गाव, पाडा, वस्ती, दुर्गम आदिवासी जमाती |
लाभ | छतावर सोलर बसविण्यासाठी आर्थिक सहाय्य |
योजनेची सुरुवात | 2016 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
Solar Panel Yojana Maharashtra सोलर पॅनल योजनेचे उद्दिष्ट:
- नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- घरगुती सौर ऊर्जा योजना ची सुरुवात केंद्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे.
- राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शासनावरील वाढत चाललेला विजेचा भर कमी करणे.
- नागरिकांना मोफत ऊर्जेचा स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
Solar Panel Yojana Maharashtra सोलर पॅनल योजनेचा फायदा:
- जेव्हा तुम्ही सौर पॅनेल खरेदी करता तेव्हा तुम्हाला 40% पर्यंत सबसिडी मिळते.
- अतिरिक्त वीजनिर्मिती करून वीज मंडळाला अतिरिक्त पैसे मिळण्यास मदत होऊ शकते.
- सौर पॅनेल बसवल्याने विजेचा वापर 40 ते 50% कमी होऊ शकतो.
- सौरऊर्जा वापरणे खूप सोपे आहे.
- सोलर पॅनल बसवण्याचा खर्च ४ ते ५ वर्षात वसूल होतो.
- एकदा सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 वर्षांच्या वीज बिलातून सवलत मिळते.
Solar Panel Yojana Maharashtra सोलर पॅनल योजनेची कागदपत्रे :
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- अर्जदाराचे बचत बँक खाते
- अर्जदाराच्या घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे
- अर्जदाराच्या घरातील सह-हिस्सेदारांचे संमतीपत्र
- चालू विज बिल
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष रहिवाशी असल्याचा दाखला
- अर्जदाराचे अलिकडल्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
- रेशन कार्ड अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.
सोलर पॅनल योजनेची निर्मिती करणाऱ्या यंत्रणेची किंमत खालील प्रमाणे:
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रूफटॉप सौर ऊर्जा उपकरणाची 5 वर्ष देखभाल खर्चासहित करण्यात येणारी किंमत
सोलर पॅनल ऊर्जा उपकरण | किंमत |
1 किलोवॅट | 46,820/- रुपये |
1 ते 2 किलोवॅट | 42,470/- रुपये |
2 ते 3 किलोवॅट | 41,380/- रुपये |
3 ते 10 किलोवॅट | 40,290/- रुपये |
10 ते 100 किलोवॅट | 37,020/- रुपये |
सोलर पॅनल योजनेअंतर्गत प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे:
वरील दराप्रमाणे जर एखाद्याला 3 किलोवॅट क्षमतेचे रुफटॉप सौर सौर उपकरण बसवायचे असेल तर त्यास
- 3 × 41,380 = 1,24,140/- रुपये रक्कम भरावी लागेल.
- या रकमेमध्ये महाराष्ट्र शासनाचे 40 टक्के अनुदान असते.
- 40 टक्के अनुदान म्हणजे 1,24,140 × 40 ÷ 100 = 49,656/- रुपये
- 49,656/- रुपये शासनाकडून या योजनेअंतर्गत वित्त सहाय्य दिले जाते.
- म्हणजे ग्राहकास फक्त 1,24,140 – 49,656 = 74,484/- रुपयांचा खर्च करावा लागतो.
सोलर पॅनल योजनेचा अर्ज करण्याची पद्धत:
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- होम पेज वर Apply For Solar Rooftop बटनावर क्लिक करायचं आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करायची आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात या योजनेचा अर्ज ओपन होईल अर्ज भरायच्या आधी दिलेल्या सूचना वाचून घेणे आवश्यक आहे.
- आता अर्जात विचारलेली खालीलप्रमाणे सर्व माहिती भरायची आहे.
- विचारलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स अपलोड करावी लागेल.सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
शासनाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सोलर पॅनल योजनेचा Toll Free Number | 1800-180-3333 |
टेलिग्राम | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
- पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन | PM Vishwakarma Yojana Online Apply 2024
- प्रधानमंत्री आवास योजना नवीन यादी | PM Awas Yojana New List 2024
- प्रधानमंत्री कौशल विकास योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन २०२३ pradhanmantri kaushal vikas yojana
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 (PMMVY) फायदे आणि अर्ज
- सुकन्या समृद्धि योजना 2024 महाराष्ट्र अर्ज | Sukanya Samriddhi Yojana Maharashtra
- The Most Accurate Actual size of Online Ruler