Samuhik Vivah Yojana Maharashtra : नमस्कार ,आपल्या राज्यातील शेतमजूर /शेतकरी तसेच मंजूरी करून आपले उदरनिर्वाहाची सोय करतात आशा लोकाना त्यांच्या मुलाचे किवा मुलीचे लग्न करणे खूप कठीण आसते ज्यांच्याकडे लग्न लावण्यासाठी पैसे नाहीत यासाठी सरकारने एक सामूहिक विवास योजना सुरू करायचे ठरवलेले आहेत त्याबद्दल आपण आपल्या या मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना मध्ये बागणार आहोत.
शासनाच्या या निर्णयाने समाजात आंतरधर्मीय समानता आणि सामाजिक सलोखा वाढावा यासाठी राज्य शासनामार्फत ऑक्टोबर २०१७ पासून “मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना” राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत विविध समाज आणि धर्मांच्या चालीरीती व परंपरेनुसार विवाह कार्यक्रम आयोजित केले जातात. . विवाह सोहळ्यातील अनावश्यक प्रदर्शने आणि अपव्यय दूर करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
राज्यातील सर्व वर्गातील कुटुंबापैकी ज्या कुटुंबाचे 2,00,000/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न मर्यादेत येणाऱ्या सर्व वर्गवारीतील कुटुंबे या योजनेत समाविष्ट आहेत आणि ते या योजनेचा लाभ घेऔ शकतात.तसेच या योजनेंतर्गत विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटित महिलांच्या विवाहाचीही तरतूद केलेली आहे.
या योजनेत राज्यातील मुलीच्या विवाहित जीवनात आनंदासाठी आणि घराच्या नवीन संसार स्थापनेसाठी रु.35,000/- अनुदान दिले जाते आणि लग्न समारंभासाठी आवश्यक साहित्य जसे की कपडे, अंगठ्या, पायल, भांडी इत्यादींची खरेदी केली जाते. रु. 10,000/- दिले जातात आणि प्रत्येक जोडप्याच्या लग्नासाठी रु. अशा प्रकारे, योजनेअंतर्गत, जोडप्याच्या विवाहासाठी एकूण रु 51,000/- प्रदान केले जातात
नागरी संस्था (नगर पंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका), क्षेत्र पंचायत, जिल्हा पंचायत स्तरावर किमान 10 जोडप्यांची नोंदणी आणि विवाहासाठी सामूहिक विवाह आयोजित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Contents
सामूहिक विवाह योजना यासाठी योजनेच्या अटी व शर्ती
- फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचं अलभ दिल जाणार नाही.
- फक्त पहिल्या विवाहासाठीच लाभ दिला जाईल.
- अर्जदार मुलगी शेतकरी / शेतमजूर कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
- सदर योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
- या योजनेअंतर्गत सामुहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहील.
- वधू ही महाराष्ट्रा राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे त्याबाबत ग्रामसेवक / तलाठी यांचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- विवाह सोहळ्याच्या दिनांकास वराचे वय 21 वर्षे व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असता कामा नये.
- वधू-वर पुनर्विवाह करत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही परंतु वधू विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येईल.
- या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्यांना दिला जाणार नाही कारण त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वत्रंत्र योजना राबविण्यात येत आहेत.
- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला कमी वेळात कागदपत्रांची छाननी करणे, जोडप्यांची पात्रता निश्चित करणे इत्यादि शक्य व्हावे, याकरीता एका स्वयंसेवी संस्थेस एका सोहळयात किमान 5 व कमाल 100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील तसेच 100 जोडप्यांच्या वर समावेश असलेल्या विवाह सोहळयासाठी अनुदान अनुज्ञेय राहणार नाही कारण 100 पेक्षा मोठे समारंभ आयोजित करणाऱ्या संस्थांची स्वतःची आर्थिक क्षमता चांगली असणे अपेक्षित आहे.
- एका स्वयंसेवी संस्थेला वर्षात फक्त 2 वेळाच सामूहिक विवाह समारंभ आयोजित करता येतील त्यापेक्षा जास्त विवाह सोहळे आयोजित केल्यास त्यासाठी कोणतेही शासकीय अनुदान देण्यात येणार नाही.
- स्वयंसेवी संस्थेला लग्नाच्या 1 महिना अगोदर महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांना अर्ज व कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे तसे न केल्यास या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्यांच्या लग्नाचे विडिओ रेकॉर्डिंग तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
सामूहिक विवाह योजना यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
- वधु वराचे आधार कार्ड
- गावाचे रहीवासी असल्यास ग्रामसेवक / तलाठी यांचा रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- पालकाच्या बँक पासबुकची झेरॉक्स
- लाभार्थ्याचे पालक हे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून संबंधीत शेतकऱ्याच्या जमीनीचा 7/12 चा उतारा
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (वधुच्या वडीलांचे / आईचे)
- जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत.
- लग्नाचा दाखला
- बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्याबाबत वर/वधू यांनी लिहुन द्यावयाचे विहीत नमूण्यात प्रतिज्ञापत्र.
हे पण वाचा :
- पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन | PM Vishwakarma Yojana Online Apply 2024
- प्रधानमंत्री आवास योजना नवीन यादी | PM Awas Yojana New List 2024
- प्रधानमंत्री कौशल विकास योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन २०२३ pradhanmantri kaushal vikas yojana
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 (PMMVY) फायदे आणि अर्ज
- सुकन्या समृद्धि योजना 2024 महाराष्ट्र अर्ज | Sukanya Samriddhi Yojana Maharashtra
- The Most Accurate Actual size of Online Ruler