Raksha Bandhan Speech in Marathi : रक्षाबंधन मराठी भाषण नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये रक्षाबंधन या सणानिमित्त अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आज आपण या लेखामध्ये रक्षाबंधन निमित्त भाषण मराठीमध्ये बघणार आहोत आपण पाहणार आहोत रक्षाबंधन विषयी अतिशय सुंदर मराठी भाषण.
Raksha Bandhan Speech in Marathi | रक्षाबंधन मराठी भाषण
भाषण सुरू करण्यात अगोदर सर्वप्रथम भाषणामध्ये या महत्त्वाच्या ओळी असाव्यात जेणेकरून भाषणाची सुरुवात चांगली होते .
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो
नात्याचं अतूट बंधन म्हणजे राखी
कवचरुपी सौरक्षण म्हणजे राखी
एक सहवास देते राखी
जगण्यातला आस देते राखी
यशाचा तोरण आहे राखी
विजयी रणांगण आहे राखी
भाऊ बहिणीचं राखबंधन राखी
मराठी महिन्याप्रमाणे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येणारा राखी पौर्णिमेचा सण हा बहीण भावाच्या नात्याची वीण दृढ करतो . भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचा हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. राखी म्हणलं की साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या अत्यंत वेगळ्या भावना आहेत.
श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा असे वेगवेगळ्या नावाने ही ओळखली जाते. राखी पौर्णिमेला चंद्राचे अवकाशात पूर्ण बिंब असते .चंद्राचे स्त्री शी भावाचे नाते असते म्हणून कदाचित राखीपौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात .
रक्षाबंधन हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो. भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा करण्यात येतो.[Raksha Bandhan Speech in Marathi]
राखी’ ह्या शब्दातच “रक्षण करणे ’ – “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसून येतो. यामध्ये तिचा दुबळेपणा नाही तर तिचा तिच्या भावाच्या कतृत्त्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच त्यांच्या नात्यातील आपलेपण जपण्यासाठी राखीपौर्णिमा साजरी करण्यात येते. या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे. त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही. भावाबहिणीचे नाते हे भांडणाचे, खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून त्या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे.
काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. रक्षाबंधन या सणाची सुरुवात नेमकी झाली कशी तर ,पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे.
दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.
राखीचा खूपच जुना इतिहास आहे. आपण याची पौराणिक कथा तर जाणून घेतलीच आहे. तर इतिहासात याचे अनेक दाखले देण्यात येतात. महाभारतामध्ये सांगण्यात आले आहे की, श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. त्यावेळी पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली आणि त्याचा रक्तस्राव थांबवला. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला आणि आजीवन त्याने दौपदीचा भाऊ म्हणून तिचे रक्षण केले.
इतिहासातील दुसरे उदाहरण सांगायचे झाले तर चित्तौढगडची राणी कर्मावती हिने बहादुरशाहपासून आपली रक्षा करण्यासाठी मुघल बादशाह हुमायूला राखी बांधली होती. राखी बांधल्यानंतर राजा हुमायूने राणी कर्मावतीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली असे सांगण्यात येते.
हा बहीण भावाचा पवित्र बंधन असेच जन्मोन्तरी कायम आणि पवित्र असावं अशी आशा आणि जाता जाता एवढंच म्हणेन कि
दृढ बांध हा राखीचा ,
दोन मानाचं अतूट एक बंधन आहे…..
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणार , अलवार स्पंदन आहे……
Raksha Bandhan Speech in Marathi
या लेखात आपण रक्षाबंधन बद्दल भाषण मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.