Mahatma Phule Jan Arogya yojana in marathi |महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी 2024

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना Mahatma Phule Jan Arogya yojana in marathi वरती मित्रांनो नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे सरकारकडून नागरिकांसाठी एक योजना राबविली जाते ज्याचे नाव आहे

आपण आज या योजनेची माहिती पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी आहे ही योजना उपचार करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेत समावेश आहे – एग्रीकल्चर ओपन थेरेपी आणि इतर महत्त्वाच्या शासकीय सेवा.

ही योजना आर्थिक दुर्बल लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी आहे. योजनेसाठी पात्र नागरिकांनी खाली दिलेल्या शासकीय संकेतस्थळावर अर्ज करावा. या योजनेसाठी पात्रता म्हणजे रेशन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना ऑनलाईन नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्र्य रेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात ह्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे जी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

महात्मा फुले योजनेची वैशिष्ट्ये

महात्मा फुले जन आरोग्य योजना रुग्णालय सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा महात्मा फुले योजनेद्वारे वैद्यकीय उपचारांसाठी प्रति वर्ष रु.1.5 लाखांपर्यंतचे आर्थिक संरक्षण दिले जाते. पॉलिसीधारकांनी भरावे लागणारे कोणतेही पेमेंट नाहीत. अशा प्रकारे ते या योजनेचे वैद्यकीय उपचार आणि लाभ रोखमुक्त प्रक्रिया म्हणून घेऊ शकतात. महाराष्ट्र राज्य सरकार, महात्मा फुले योजनेच्या संदर्भात, प्रिमीयम आकार घेते. या योजनेत आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी नमूद केलेला नाही. पॉलिसीधारक दरवर्षी एका वैद्यकीय शिबिरात सहभागी होऊ शकतात, जे पूर्णपणे विनामूल्य आहे.

महात्मा ज्योतिबा फुले योजना चे फायदे

  • लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 5 लाखापर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते.
  • लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा त्या कुटुंबातील अनेक व्यक्तींना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाते.
  • लाभार्थ्यास वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांमधून देण्यात येणारा उपचार तसेच रोगाचे निदान व एखाद्या आजारासाठी आवश्यक औषधोपचार, भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च दिला जातो.
  • आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांच्याजवळील 7/12 उतारा व फोटो ओळखपत्राच्या आधारे विमा संरक्षण केले जाते.
  • मूत्रपिंड प्रत्यारोपण व इतर गंभीर उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते.
  • ही योजना पूर्णपणे संगणकीकृत असून या योजने अंतर्गत समाविष्ट रुग्णालयातून लाभार्थ्यास सर्व शिधापत्रिकेच्या aआधारे विमा संरक्षण दिले जाते.
  • महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णांना रुग्णालयातून मुक्त केल्यावर 10 दिवसांपर्यंत च्या लागणाऱ्या सेवांसाठी विमा संरक्षण दिले जाते.
  • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील नागरिक एखाद्या आजारासाठी तसेच शस्त्रक्रियेला लागणाऱ्या पैशांसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • गंभीर आजारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशांसाठी आता नागरिकांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची गरज देखील भासणार नाही. [Mahatma Phule Jan Arogya yojana in marathi]

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती अंतर्गत समाविष्ट रुग्णालये

या योजनेमध्ये 30 पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय, निम शासकीय, खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे.
लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतो.
या योजनेमध्ये खासगी आणि शासकीय 973 रुग्णालये समाविष्ट आहेत. [Mahatma Phule Jan Arogya yojana]

खालील रुग्णालयांमार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना चा लाभ घेता येईल.

  • महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांची यादी: 
Download

Mahatma Phule Jan Arogya Yojana In Marathi अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

ज्योतिबा फुले योजना चे नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील गरीब कुटुंब ज्यांच्याजवळ पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा रेशन कार्ड आहे असे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • अर्जदार नागरिकांकडे वैध शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. [महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी]
योजनेचे नावमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील कुटुंबे
लाभनिशुल्क आरोग्य सुविधेचा लाभ
योजनेचा उद्देशआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना निशुल्क आरोग्य सुविधा प्रदान करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Mahatma Phule Jan Arogya yojana in marathi चे लाभार्थी

गटलाभार्थी तपशील
गट अमहाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हयांमधील अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन
यांचेकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका,
अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी ‍ शिधापत्रिकाधारक कुटुंबे.
गट बअवर्षणग्रस्त 14 जिल्हयातील (औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर,
नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा)
शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे
गट क1. शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला
आश्रमातील महिला, शासकीय वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक

2. माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले
कुटुंबातील सदस्य.

3. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील
नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना चे लाभार्थी

सामाजिक, आर्थिक व जा‍तनिहाय जनगणनेच्या वंचित व व्यावसायिक निकषानुसार अनुक्रमे ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कुटुंबांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. [Mahatma Phule Jan Arogya yojana in marathi]

क्षेत्रलाभार्थ्यांचा तपशील
शहरीशहरी भागातील खालील 11 व्यावसायिक गटातील कामगार योजनेसाठी पात्र आहेत.
• कचरा वेचक
• भिक्षुक
• घरगुती कामगार
• गटई कामगार/ मोची/फेरीवाले/रस्त्यावर सेवा पुरविणारे अन्य कामगार
• बांधकाम कामगार/ प्लंबर/ गवंडी/कामगार/ रंगारी/ वेल्डर/सुरक्षा रक्षक/हमाल व
डोक्याने भार वाहणारे अन्य कामगार
• सफाईगार/स्वच्छक/ माळी
• घरकाम करणारे/ हस्तकला कारागीर/शिंपी,
• वाहतूक कर्मचारी/ चालक/ वाहक/ चालक व वाहकांचे मदतनीस/हातगाडी ओढणारे/सायकल रिक्षा ओढणारे
• दुकानात काम करणारे/ सहाय्यक/ लहान आस्थापनांमधील शिपाई/ मदतनीस/ अटेण्डट/ वेटर
• वीजतंत्री/ मेकॅनिक/ असेम्ब्ली / दुरुस्ती करणारे
• धोबी व वॉचमन
ग्रामीणग्रामीण भागाच्या एकूण 7 वंचित निकषांपैकी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये खालील सहा वंचित निकषातील (D1 to D5 and D7) किमान एक निकषात बसणाऱ्या कुटुंबांचा व आपोआप समाविष्ट (बेघर, भिक्षुक, स्वच्छता कर्मी, निराधार कुटुंबे, मुलत: अनुसूचित जमाती व कायदेशीर बंधपत्रित कामगार) निकषांतील कुटुंबांचा समावेश होतो.
• D1- कच्च्या भिंती व कच्च्या छताच्या एका खोलीत राहणारे कुटुंब
• D2- 16-59 वयोगटातील प्रौढ सदस्य नसलेले कुटुंबे
• D3- 16-59 वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेले कुटुंब
• D4- दिव्यांग कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे
• D5- अनुसूचित जाती व जमाती मधील कुटुंबे
• D7- भूमिहीन मजूराची कुटुंबे

Jyotiba Phule Jan Arogya Yojana चा लाभ

  • Mahatma Phule Jan Aarogya Yojana अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यास संपूर्ण आरोग्य सहाय्य दिले जाते.
  • राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांना आरोग्य सुविधा देण्याच्या बाबतीत सशक्त व आत्मनिर्भर बनविले जाते.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
  • गरीब कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास होतो.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब गरीब कुटुंबांना त्यांच्या उपचारासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही. 
  • या योजनेअंतर्गत किडनी ट्रांसप्लांटेशन साठी 3 लाख रुपये आणि कुटुंबाच्या उपचारासाठी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 2 लाखापर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत गंभीर उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 3 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत रुग्णांना रुग्णालयातून मुक्त केल्यावर 10 दिवसांपर्यंत च्या लागणाऱ्या सेवांसाठी विमा संरक्षण दिले जाते.
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला निशुल्क आरोग्य सुविधा दिली जाते त्यामुळे लाभार्थ्यास स्वतःकडील एक रुपयाचा सुद्धा खर्च येत नाही.
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कुठल्याही जात धर्माचे बंधन नाही सर्व जाती धर्माचे व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवू शकतात
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांमधून देण्यात येणारा उपचार तसेच रोगाचे निदान व एखाद्या आजारासाठी आवश्यक औषधोपचार, भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च दिला जातो.
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आजाराचे निदान मोफत केले जाते. [Mahatma Phule Jan Arogya yojana in marathi]

महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्वाच्या गोष्टी

  • पूर्वी हि योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जात होती जिचे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना करण्यात आले.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित असलेले बांधकाम कामगार व त्यांच्यावर अवलंबित कुटुंबियांचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. [महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी]

महात्मा फुले जन आरोग्य योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील (पिवळे) रेशनकार्ड
  • दारिद्र्य रेषेवरील (केशरी) रेशनकार्ड
  • अंत्योदय रेशनकार्ड
  • अन्नपूर्णा रेशनकार्ड
  • रहिवाशी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • 3 पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • उत्पन्नाचा दाखला

Free About Us Page Generator | Free Tool 2024

Creative best Names for Cricket Team

Share With Your Frends

Driven by a passion for writing and a thirst for knowledge, Rutuja Waghmare is embarking on a journey into content creation while actively exploring job opportunities and educational pathways. With a dedication to learning and a keen interest in content creation, she aims to provide valuable insights through engaging articles and blog posts. Eager to connect and grow, Rutuja is committed to sharing information on career development and educational opportunities.

3 thoughts on “Mahatma Phule Jan Arogya yojana in marathi |महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी 2024”

Leave a Reply