Ladki Bahin Yojana Online Apply 2024 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’;महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये, अर्ज कसा कराल?

Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार आपल्या नौकरी सेंटर मध्ये आपले स्वागत आहे . महाराष्ट्रातील सर्व मुली व महिला यांच्यासाठी सर्वात आनंदाची घोषणा ही महाराष्ट्र सरकार ने केली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली आहे

महाराष्ट्रातील मुली व महिलांना आता दर महा 1500 रू मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत मुली व महिला यांना मदत व्हावी यासाठी हे पैसे दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्या आखेर महिलाना १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्यास उद्या दि. ३०.०६.२०२४ वार सोमवार पासून सुरवात करण्यात आलेली आहे. या योजनेच्या संकल्पा नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahini Yojana) मुलींच मोफत शिक्षण,बेरोजगरांसाठी योजनेंची घोषणा करण्यात आली १ जुलै पासून या योजनेची अमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana Online Apply )

योजनेचे नावमुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना
राज्यमहाराष्ट्र
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कधी सुरू झाली1 जुलै 2024
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मुली व महिला
वयाची अट21 ते 60 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जुलै 2024
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाइन
महिलांना लाभ1500 रू महिना
पहिला हप्ता कधी मिळेल14 ऑगस्ट 2024
हप्ता कधी मिळेलप्रत्येक महिन्याच्या 15 तारखे पर्यंत
अर्ज कुठे करावाअंगणवाडी/ग्रामपंचायत/सेतू सुविधा केंद्र
Mazi Ladaki Bahin Yojana GR PDFयेथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप:

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार आधार लिंक असलेल्या थेट लाभ हस्तांतर (direct benefit transfer) या सक्षम बँक खात्यात दरमहा रु १५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र आणि राज्य शांशनच्या अन्य आर्थिक लाभच्या योजनेच्या द्वारे रु १५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम पत्र महिलेस देण्यात येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कोणाला मिळणार आहे:

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

[Ladki Bahin Yojana Online Apply]

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत केलेले बदल :

काय आहेत बदल पाहून घ्या

  • अर्ज करण्याची तारीख ३१ ऑगस्ट २०२४
  • जमीची अट पूर्ण काढून टाकली आहे.
  • ६० वर्ष ऐवजी ६५ वर्ष करण्यात आले आहे.
  • पिवळे किवा केशरी रेशन कार्ड असेल तर २.५० लाख उत्पन्न दाखल्यातून सूट दिली आहे.
  • कुटुंबातील अविवाहित महिलेला सुद्धा याचा लाभ घेता येईल.
  • परराज्यातील महिलेने महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न केले असेल तर पतीची कंगटपत्रे ग्राह्य धरली जातील.
  • जर अर्ज सपटेबर पर्यन्त भरला तरी पैसे हे १ जुलै पासूनचे सर्व मिळतील.
  • सरकारी कर्मचारी अर्जासाठी कोणतेही पैसे घेणार नाही.

या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक:

  • लाभार्थ्याचे आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखांपर्यंत असणे अनिवार्य)
  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड
  • सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?

  • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  • योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल.
  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
  • वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
  • अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :

Share With Your Frends

Driven by a passion for writing and a thirst for knowledge, Rutuja Waghmare is embarking on a journey into content creation while actively exploring job opportunities and educational pathways. With a dedication to learning and a keen interest in content creation, she aims to provide valuable insights through engaging articles and blog posts. Eager to connect and grow, Rutuja is committed to sharing information on career development and educational opportunities.

1 thought on “Ladki Bahin Yojana Online Apply 2024 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’;महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये, अर्ज कसा कराल?”

Leave a Reply