२००+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ ( Vakyaprachar in marathi):शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात.
मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ हा घटक अनेक स्पर्धा परीक्षेच्या मानाने महत्वाचा मानला जातो.
चला तर बघूयात काही महत्वाचे वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ.
- अपराध पोटात घालणे
- अर्थ: क्षमा करणे.
- अति तेथे माती होणे
- अर्थ: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट होणे.
- अक्कल पुढे करणे
- अर्थ: बुद्धीचा भलताच उपयोग करणे.
- अकांड तांडव करणे
- अर्थ: रागाने आदळआपट करणे.
- आबाळ होणे
- अर्थ: दुर्लक्ष होणे, हाल होणे.
- अत्तराचे दिवे जाळणे
- अर्थ: भरपूर उधळपट्टी करणे.
- अन्नास जागणे
- अर्थ: उपकार स्मरणे, उपकाराची जाणीव ठेवणे.
- अठरा विश्वे दारिद्र्य असणे
- अर्थ: अतिशय गरिबी असणे.
- अन्न अन्न करणे
- अर्थ: अन्नासाठी फिरणे.
- अळवावरचे पाणी
- अर्थ: क्षणभंगूर.
- अग्निदिव्य करणे
- अर्थ: प्राणांतिक संकटातून जाणे.
- अडकित्त्यात सापडणे
- अर्थ: पेचात सापडणे, मोठ्या अडचणीत सापडणे.
- अवकळा येणे
- अर्थ: वाईट अवस्था येणे.
- अगतिक होणे
- अर्थ: उपाय न चालणे, निरुपाय होणे.
- अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
- अर्थ: थोड्याशा यशानेच गर्व करणे.
- वदसा आठवणे
- अर्थ: वाईट बुद्धी सुचणे.
- अवगत होणे
- अर्थ: प्राप्त होणे.
- अवहेलना करणे
- अर्थ: दुर्लक्ष करणे, अपमान करणे.
- अवाक् होणे
- अर्थ: स्तब्ध होणे.
२००+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ ( Vakyaprachar in marathi)
- आकाशाला गवसणी घालणे
- अर्थ: अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.
- अरेरावी करणे
- अर्थ: मग्रुरीने वागणे.
- अन्नास मोताद होणे
- अर्थ: उपासमार होणे, अन्न मिळण्यास कठीण होणे.
- तिश्री करणे
- अर्थ: शेवट करणे.
- इमानास जागणे
- अर्थ: इमान कायम ठेवणे.
- इकडचे तोंड तिकडे करून टाकणे
- अर्थ: अतिशय जोराने थोबाडात मारणे.
- इंगा जिरणे – गर्व नाहीसे होणे, खोड मोडणे.
- अर्थ: दुर्लक्ष होणे, हाल होणे.
- इकडचा डोंगर तिकडे करणे
- अर्थ: फार मोठे कार्य पार पाडणे.
- इरेला पेटणे
- अर्थ: इर्षेने खेळू लागणे.
- इरेस पडणे
- अर्थ: एखादी गोष्ट करण्याची जिद्द असणे.
- उचल बांगडी करणे
- अर्थ: जबरदस्तीने हलविणे.
- उच्छाद मांडणे
- अर्थ: उपद्रव देणे.
- उत्कंठा असणे
- अर्थ: उत्सुक असणे.
- उन्हाची लाही फुटणे
- अर्थ: अतिशय कडक ऊन पडणे.
- उभ्या उभ्या चक्कर टाकणे
- अर्थ: सहज जाऊन पाहून येणे.
- ऊर फाटणे
- अर्थ: अतिशय दुःख होणे.
- उराशी बाळगणे
- अर्थ: अंतःकरणात जतन करून ठेवणे.
- उलटी अंबारी हाती येणे
- अर्थ: भीक मागण्य
- एकमत होणे
- अर्थ: सर्वांचा सारखा विचार असणे.
- एक घाव दोन तुकडे करणे •
- अर्थ: ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात आणणे.
- एकजीव होणे
- अर्थ: पूर्णपणे मिसळून जाणे.
- एकेरीवर येणे
- अर्थ: भांडायला तयार होणे.
- एखाद्या वस्तूवर डोळा असणे
- अर्थ: एखादी वस्तू प्राप्त करून घेण्याची इच्छा असणे.
- एकटक पाहणे
- अर्थ: स्थिर नजरेने पाहणे.
- एका पायावर तयार असणे
- अर्थ: फार उत्कंठीत होणे.
- एकाग्रचित्त होणे
- अर्थ: मन केंद्रित करणे.
- एका वट्टात बोलणे
- अर्थ: एका दमात बोलणे.
- ओढ लागणे
- अर्थ: तीव्र इच्छा होणे.
- ओली सुकी करणे
- अर्थ: नाणे फेक करून निर्णय घेणे.
- ओटीत घालणे
- अर्थ: संगोपनासाठी दुस-यांच्या हवाली करणे.
- ओवाळून टाकणे
- अर्थ: तुच्छ समजून फेकून देणे.
- ओस होणे
- अर्थ: रिकामे होणे.
- ओक्शा बोक्शी रडणे
- अर्थ: खूप रडणे.
- अंगाचा खुर्दा होणे
- अर्थ: शरीराला त्रास होणे.
- अंगावर घेणे
- अर्थ: एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे.
- अंगाचे पाणी पाणी होणे
- अर्थ: घाम येणे.
- अंगाचा तीळपापड होणे
- अर्थ: अतिशय संताप येणे.
- अंगाची लाही लाही होणे
- अर्थ: क्रोधाने क्षुब्ध होणे, मनाचा जळफळाट होणे.
- अंगावर मूठभर मांस चढणे
- अर्थ: धन्यता वाटणे.
- अंग चोरणे
- अर्थ: अंग रारवून काम करणे.
- अंग टाकणे
- अर्थ: शरीराने कृश होणे, रोडावणे.
- अंगावर रोमांच उभे राहणे
- अर्थ: भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे.
- अंगावर काटा उभा राहणे
- अर्थ: भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे.
- अंगवळणी पडणे
- अर्थ: सवय होणे.
- अंगावर मास नसणे
- अर्थ: कृश होणे, प्रकृती खालावणे, खूप थकणे.
- अंग शहारून टाकणे
- अर्थ: अंगावर रोमांच उभे राहणे.
- अंगात त्राण नसणे
- अर्थ: अंगातील शक्ती नाहीशी होणे.
- कपाळाला आठ्या पडणे –
- अर्थ: नाराजी दिसणे.
२००+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ ( Vakyaprachar in marathi)
- कपाळावर हात मारणे –
- अर्थ: दुःख होणे, निराश होणे.
- कसोटीस उतरणे –
- अर्थ: अपेक्षित गोष्ट यशस्वीपणे करून दाखविणे.
- कळ लावणे –
- अर्थ: भांडण लावणे.
- काट्याने काटा काढणे –
- अर्थ: एका शत्रूच्या सहाय्याने दुस-या शत्रूचा पराभव करणे.
- कान टवकारून ऐकणे –
- अर्थ: अगदी लक्षपूर्वक ऐकणे.
- कान लांब होणे –
- अर्थ: ऐकण्यासाठी उत्सुक असणे, अक्कल कमी होणे (गाढवाचे कान?).
- कान भरणे –
- अर्थ: चुगली करणे, चहाड्या करणे, मनात किल्मिश निर्माण करणे.
- कान उघाडणी करणे –
- अर्थ: खरमरीत उपदेश करणे, कडक शब्दात चूक दाखवून देणे.
- कावरा बावरा होणे –
- अर्थ: बावरणे, घाबरणे.
- कपाळ फुटणे –
- अर्थ: दुर्दैव ओढवणे, मोठी आपत्ती कोसळणे.
- कपाळमोक्ष होणे –
- अर्थ: मरणे, नाश पावणे, डोके फुटून मृत्यू येणे.
- केसाने गळा कापणे –
- अर्थ: विश्वासघात करणे.
- केसालाही धक्का न लावणे –
- अर्थ: अजिबात त्रास न होणे.
- खच्चून जाणे –
- अर्थ: धीर सुटणे.
- खूणगाठ बांधणे –
- अर्थ: पक्के ध्यानात ठेवणे.
- खो घालणे –
- अर्थ: अडचण आणणे, विघ्न निर्माण करणे.
[२००+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ]
- गटांगळ्या खाणे –
- अर्थ: नाकातोंडा तों त पाणी जाऊन जीव घाबरा होणे.
- गत्यंतर नसणे –
- अर्थ: नाईलाज असणे, दुसरा उपाय नसण.
- गळ्यात पडणे –
- अर्थ: अतिशय आग्रह करणे.
- गंगेत घोडे न्हाणे –
- अर्थ: एखादे मोठे काम पूर्ण होणे.
- गहिवरून जाणे –
- अर्थ: दुःखाने कंठ दाटून येणे.
- गयावया करणे –
- अर्थ: दीनवाणी प्रार्थना करणे, विनवणी करणे.
- गर्भगळीत होणे –
- अर्थ: अतिशय घाबरणे, भयभीत होणे.
- घोर लागणे –
- अर्थ: काळजी निर्माण होणे.
- घामाचे पाझर फुटणे –
- अर्थ: खूप घाम येणे.
- घात होणे –
- अर्थ: नाश होणे.
- चढवून ठेवणे –
- अर्थ: एखाद्याला वाजवीपेक्षा जास्त महत्व देणे.
- चव्हाट्यावर आणणे –
- अर्थ: उघडकीस आणणे, जाहीर करणे.
- चकित होणे –
- अर्थ: आश्चर्य वाटणे.
- चाहूल लागणे –
- अर्थ: माहीत होणे.
- चिंता लागणे –
- अर्थ: काळजी वाटणे.
- चिंतातूर होणे –
- अर्थ: अतिशय काळजी वाटणे.
- छतीसाचा आकडा असणे –
- अर्थ: मतभेद असणे.
- छाती आनंदाने फुलणे –
- अर्थ: खूप आनंद होऊन अभिमान वाटणे.
- जिवाची पर्वा न करणे –
- अर्थ: प्रत्यक्ष प्राणाचीही फिकीर न करणे.
- जिवावर उदार होणे –
- अर्थ: प्राण देण्यास तयार असणे.
- जिवास खाणे –
- अर्थ: मनाला
- जिव्हारी लागणे –
- अर्थ: अतिशय वाईट वाटणे.
- जिद्द असणे –
- अर्थ: ईर्षा असणे.
- जन्माचे दारिद्रय फिटणे –
- अर्थ: गरिबी कायमची नाहीशी होणे.
- जिवाची तगमग होणे –
- अर्थ: बेचैन होणे, अस्वस्थ होणे.
- जिवावर बेतणे –
- अर्थ: जीव धोक्यात येणे.
- जीव मेटाकुटीस येणे –
- अर्थ: त्रासाने अगदी कंटाळून जाणे.
- जीव ओवाळून टाळणे –
- अर्थ: अतिशय प्रेम करणे.
- झळ लागणे (पोहोचणे) –
- अर्थ: एखाद्या गोष्टीचा थोडाफार परिणाम भोगावा लागणे.
- टिवल्या बावल्या करणे –
- अर्थ: कसातरी वेळ घालविणे.
- टुरटुर लावणे –
- अर्थ: थोडा वेळ कर्तृत्वाची ऐट मिरविणे.
- टाहो फोडणे –
- अर्थ: मोठ्याने आकांत करणे.
- ठिय्या देणे –
- अर्थ: (एका जागेवरून) मुळीच न हलणे.
- डोळे वटारणे (करणे) –
- अर्थ: डोळे मोठे करून रागाने पाहणे.
- डोळे पांढरे होणे –
- अर्थ: अत्यंत घाबरणे, मरायला टेकणे.
- डोक्यावर मिरी वाटणे –
- अर्थ: वरचढ होणे.
- ढोर कष्ट करणे –
- अर्थ: खूप कष्ट करणे.
- तोंडा तों ला पाने पुसणे –
- अर्थ: चांगलेच फसविणे, दगा देणे.
- तहान लागली की विहीर खणणे –
- अर्थ: गरज लागली की धावाधाव करणे.
- थैमान घालणे –
- अर्थ: आरडाओरड करणे.
- देव्हा-यात बसविणे –
- अर्थ: एखाद्या व्यक्तीस देव समजून पूजा करणे.
- दात कोरून पोट भरणे –
- अर्थ: मोठ्या व्यवहारात कृपणपणाने थोडीशी काटकसर करणे.
हे पण वाचा :
- २००+मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : Marathi Mhani in Marathi २०२४
- IPS Full Form in Marathi | IPS म्हणजे काय संपूर्ण माहिती ?
- Happy Birthday Wishes For Friend In Marathi | 2024 मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
- Mahatma Phule Jan Arogya yojana in marathi |महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी 2024
- Dr Babasaheb Ambedkar Bhashan in Marathi 2024
- The Most Accurate Actual size of Online Ruler